Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकत्र्यंबक तालुक्यातील आदिवासी पाडे झाले ‘प्रकाशमय’

त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी पाडे झाले ‘प्रकाशमय’

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही वीजपुरवठा पोहचू न शकल्यामुळे आजही अनेक गावे विकासापासून वंचित राहिली आहेत.

- Advertisement -

त्यात काही गावांमध्ये वीज जोडणी झाली असूनही वरंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनासह विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नागकरिकांच्या समस्यांची गंभीर दखल घेत खासदार हेंमत गोडसे यांनी इंडियन ऑईल कंपनीच्या सी. एस. आर. फंडातून सौरदीप बसविले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक गाव, वाड्या, वस्तींवर इंडियन ऑईल कंपनीतर्फे प्रायोगिक तत्त्वावर सव्वाशे सौरदीप कार्यान्वित झाल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजेचा लखलखाट झाला असून गावे प्रकाशमय झाली आहेत. यामुळे आदीवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येत्या काही काळात आदीवासी भागातील अनेक गावांना सौर पथदीपे बसविण्याचा मानस इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सौरदीप बसविण्यात आले आहेत. याशिवाय इतरही काही गावांमध्ये येत्या काळात सौरदीप बसविणार येणार आहेत. यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना व वयोवृद्धांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

– हेमंत गोडसे, खासदार नाशिक

आमच्या गावात अजूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात देखील अडचणी येत होत्या. त्यात अंधारात जीवन जगतांना वयोवृद्धांसह महिलावर्ग व नागरिकांची गैरसोय झाली होती. खा. गोडसे यांच्या प्रयत्नातून सौर पथदीप बसविण्यात आल्याने गावात लखलखाट आला आहे.

– समाधान बोडके, ग्रामस्थ वेळुंजे

- Advertisment -

ताज्या बातम्या