Friday, May 10, 2024
Homeजळगावसोलर पिडीत शेतकर्‍यांचे आंदोलन स्थगीत

सोलर पिडीत शेतकर्‍यांचे आंदोलन स्थगीत

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

गौताळा अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशिल क्षेत्रात मध्ये कार्यान्वित बेकादेशीर फर्मी सोलर फार्मस प्रा. लि. (Fermi Solar Farms Pvt. Ltd) व जेबीएम सोलर प्रा. लि. नवी दिल्ली (JBM Solar Pvt. Ltd. New Delhi) या बेकायदा (Illegal) खाजगी सोलर प्रकल्पाची (solar project) शासन नियुक्त एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करून प्रकल्प पिडीतांना न्याय द्यावा. या मागणीसाठी येथील शेतकरी बचाव कृती समिती (Farmers Rescue Action Committee) व मोजक्या पिडीत शेतकर्‍यांसह गेल्या १८ दिवसांपासून भरपावासात आझाद मैदान मुंबई येथे सुरु असलेले धरणे आंदोलन एसआयटी चौकशीचे शेतकर्‍यांना तोंडी आश्‍वासन मिळाल्यानतंर तुर्तास स्थगित (Postponed) करण्यात आले आहे.

- Advertisement -

सोलर पिडीत शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या १८ व्या दिवशी महसूलमंत्र्यांकडून चौकशीचे आश्वासन व एसआयडी चौकशी नेमण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर प्राथमिक चौकशी/अभिप्राय गरजेचे आहे, त्यामुळे चौकशीला वेळ देण्यासाठी आंदोलन पुढील १० ते १२ दिवस तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. वेळीच चौकशी सुरू न झाल्यास, मग ? पुन्हा शेतकरी तीव्र स्वरूपचे आंदोलन छेडण्याची पिडीत शेतकर्यांची तयारी आहेत. आंदोलनाच्या १६ व्या दिवशी पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने महसूलमंत्रींनी दखल घेऊन शिष्टमंडळांची चर्चा केली असता, चौकशी करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते, परंतू लेखी स्वरूपात आश्वासन हवेत अशी कृती समितीची मागणी, असल्यामुळे , दोन दिवस आंदोलन सुरूच होते, काल १८ व्या दिवशी लेखी आश्वासनाचे पत्र घेण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या बंगल्यावर शिष्टमंडळ गेले असता, सचिवांकडून सांगण्यात आले की, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होऊन अभिप्राय आल्यानंतर आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल, ? त्याशिवाय लेखी आश्वासन देता येणार नाही, मंत्री महोदयांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहेत विश्वास ठेवा, ? चौकशीला् थोडा वेळ द्या असे सांगून अंदोलन माघे घेण्याची विनंती केली, लेखी आश्वासनावर शिष्टमंडळ आडून बसल्याने सचिवांनी परत काल महसूमंत्रींची भेट घालून दिली असता, प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन महसुलमंत्रींनी सहानुभूतिपूर्वक विचारपूस केली, चिंता करू नका जिल्हाधिकार्यास चौकशीचे आदेश दिले आहेत, चौकशीअंती कारवाई केली जाईल, असे सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. महसूलमंत्र्यांची विश्वासाहर्ता लक्षात घेऊन व प्रत्यक्ष चौकशीस शासणाला वेळ देण्यासाठी , तोंडी आश्वासनामुळे तुर्तास पुढील १० ते १२ दिवस आंदोलन स्थगित करण्याचे निर्णय कृती समितीने घेतला आहे, जर का पुढील १० ते १२ दिवसात प्रत्यक्षात चौकशीला सुरुवात झाली नाही तर मग, ? तुर्तास स्थगिती करण्यात आलेल्या आंदोलनाची दिशा बदलावून तिव्र ् स्वरूपाचे आंदोलन पुन्हा पुर्ववत करू , तसे पत्र पिडीत शेतकर्यांच्या वतीने कृती समितीने संबंधित मंत्र्यांसह आझाद मैदान पोलीस स्टेशनला दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या