Saturday, April 27, 2024
Homeनाशिककृषीदूतांकडून शेतकऱ्यांसाठी मातीपरीक्षण प्रात्यक्षिके

कृषीदूतांकडून शेतकऱ्यांसाठी मातीपरीक्षण प्रात्यक्षिके

नाशिक | Nashik

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (Rural Agriculture Work Experience Program) कर्मयोगी दु. सि. पाटील कृषी महाविद्यालयातील (Agriculture Collage) कृषीदुत प्रवीण गोकुळ कसबे याने पिंप्री (ता. त्र्यंबकेश्वर) येथे मातीपरीक्षण प्रात्यक्षिकाविषयी (Soil test demonstration) शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -

शेतकऱ्यांना मातीपरीक्षण संबंधी जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहे. यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा, माती परीक्षनानुसार खत व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिला.

या बरोबर शेतीतील मातीचे नमुने गोळा करुन त्याचे परीक्षण करण्यात आले. मातीमध्ये असणारे घटक, जमिनीचा सामू, मातीचा प्रकार याविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शेतकरी भगवान घुले, त्यांचे कुटुंब तसेच शेतीलगत असलेले शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय. बी. चव्हाण, प्रा.चेतन देसले, प्रा. नयन गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या