Saturday, April 27, 2024
Homeनाशिक२७ जानेवारीपासून समाजकल्याण सेवकांचे आंदोलन

२७ जानेवारीपासून समाजकल्याण सेवकांचे आंदोलन

नाशिकरोड । Nashik

राज्यातील समाज कल्याण विभागातील कर्मचारी विविध प्रश्नांबाबत 27 जानेवारीपासून लेखणीबंद आंदोलन करणार आहेत.

- Advertisement -

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे (गट-क) म्हणणे असे की, या विभागातील 50 टक्के पदे रिक्त असूनही सेवकांकडून अवास्तव प्रशासकीय सुधारणांची अपेक्षा करत आयुक्तांनी काही सेवकांना निलंबित केले आहे.

आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सेवकांच्या माध्यमातून झिरो पेन्डन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल कार्यपध्दतीची अंमलबजावणी केली.

त्याचा राज्यस्तरावर नारनवरे पॅटर्न म्हणून नावलौकिक झाला. मात्र, संवकांंच्या प्रश्नांकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले. अडचणी न जाणता निलंबनाची कारवाई केली आहे. ती मागे घ्यावी, रिक्त पदांची भरती करावी, योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमावा,

कंत्राटी गृहपाल पदे भरण्याचा निर्णय रद्द करावा, अनुसूचित जाती-उपयोजनेसाठी स्वतंत्र सेवक वर्ग नेमावा, सातव्या वेतन आयोग लागू करावा, अभिलेखापाल पदाची निर्मिती करावी, पदोन्नती द्यावी, वेतनवाढ द्यावी, कंत्राटी संगणक चालक, जनसंपर्क अधिकारी व विधी अधिकारी यांना कायम करावे आदी मागण्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या