राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे सामाजिक दायित्व; पूरग्रस्तांना मदतीचा हात

jalgaon-digital
1 Min Read

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे Belgaon Kurhe

इगतपुरी तालुक्यात ( Igatpuri Taluka )अति वृष्टीने घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage to houses due to Rain) झाले आहे. डोळ्या देखत घरातील संसारपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्याने नुकसानग्रस्त आदिवाासी कुटुंबाच्या डोळ्यात आसवांची दाटी निर्माण झाली आहे.

तालुक्याच्या पूर्वभागातील भंडारदरावाडी ( Bhandardarawadi )येथील वयोवृद्ध कुटुंब विठ्ठल रावजी बेंडकोळी ( Vitthal Ravji Bendokoli )हे मोलमजुरी करून आपला उरनिर्वाह करतात. परिस्थिती गरिबीची त्यातच घरातील धाण्यासह संसारपोयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली.

शासनाच्या मदतीच्या भरवशावर अवलंबून न राहता. सामाजिक दायित्व दाखवीत राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे (Rajmata Jijau Pratishthan) संस्थापक अध्यक्ष खंडरेव झनकर, नवनाथ झनकर यांनी घराची पडझड झालेल्या बेेघर वयोवृद्ध कुटुंबाला घरातील किराणा बाजारासह आर्थिक मदत करीत आधार दिला आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे भडारदारवाडी येथील रहिवासी असलेले विठ्ठल रावजी बेंडकोळी याचे घर पूर्ण पणे दबून जाऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा पूर्ण संसार पाण्यात वाहून गेला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी खंडेराव झनकर आणि नवनाथ झनकर यांना दिली त्यानी कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता किंवा सरकारी पातळीवर मदतीची वाट न बघता सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आदिवासी कुटुंबाला मदत केली. भंडारदरावाडी, भरवीर बुद्रुकच्या ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *