Thursday, April 25, 2024
Homeजळगावसामाजिक बांधिलकी, गोर-गरिबांची सेवा, हीच माझ्या कामाची पावती - बाळासाहेब पाटील

सामाजिक बांधिलकी, गोर-गरिबांची सेवा, हीच माझ्या कामाची पावती – बाळासाहेब पाटील

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon Parola

आयुष्यात बर्‍याच अडचणींचा सामना करीत संघर्षात जीवन जगल्याची जाण ठेवून गेलेल्या 35 वर्षाच्या पत्रकारितेतून समाजाच्या गोर गरीबांची सेवा व अडल्या-नडलेल्यांची कामे करतांना कधीच कंटाळा केला नाही. सामाजिक बांधिलकी जोपासताना आपला-परका भेदभाव न ठेवता समाजा व्यतिरिक्त अन्य समाजाच्या लोकांची देखील कामे केलीत. कामे करतांना कुणालाही आर्थिक झळ सोसावी लागणार नाही याची काळजी घेतली.

- Advertisement -

समाजाच्या सर्व थरातील लोकांना जवळ ठेवून अविरतपणे कामे केल्याचं फळ म्हणून तालुका स्तरावर राजपूत समाजाने समाजाध्यक्ष पद दिले, त्याच अनुषंगाने समाज हितासाठी महाराणा प्रतापसिंह बहुउद्देशीय संस्था स्थापन करून राजपूत समाज मंगल कार्यालयाचे नियोजनासाठी समाज बांधवांच्या सहकार्याने काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत. या समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी मला देवदूतच मिळावा, अशी व्यक्ती ता.मालेगावचे समाज बांधव आनंदसिंग राजपूत (ठोके) यांची योगायोगाने भेट झाली. त्यांनी माझे समाजाभिमुख कार्य पाहून समतेचा हातात हात देऊन समाज संघटनेसाठी विविध क्षेत्रात पुढे नेत राष्ट्रीय राजपूत करणी सेना राजस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष सुकदेव सिंह दादा गोगामेडी यांच्या भेटीत माझ्या समाज कामाची माहिती जाणून घेतली व मला संघटनेत सामील करून घेतले.

समाजाच्या हितासाठी माझेवर महाराष्ट्राच्या कोअर कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती, समाजाच्या हितासाठी झटणारामाणूस म्हणून सुकदेव सिंह गोगामेडी यांनी पुन्हा श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या कोअर कमिटी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशची जबाबदारी दिली.

वाढत्या वयोमानानुसार माझी इच्छा नसतानाही जबाबदार व्यक्तीमत्व व समाजाभिमुख कार्य असल्याचे म्हणत राष्ट्रीय अध्यक्ष सुकदेव सिंह दादा गोगामेडींनी ही जबाबदारी माझ्याकडे पुन्हा सोपविली आहे.

या जबाबदारीतून मला जबाबदारीने राज्याच्या जिल्हा, तालुका व ग्रामिण भागात सक्षम व समाजाभिमुख कार्य करणार्‍या पदाधिकार्‍यांची नियुक्ती करताना माझा- परका हा भेद भाव न ठेवता समाजासाठी तळमळीने काम करणार्‍या समाज बंधु-भगिनींची नियुक्ती करुन श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना समाजाभिमुख व सर्वच थरातील समाज बांधवांसाठी काम करणारी संघटना म्हणून नावारूपाला आणत सुखाचे धनी न होता दु:खात देखील धावून जाणारे पदाधिकारी उदयास आणण्याचा आमचा मानस असेल.

वर्षभरात कामाची रुपरेषा, संघटन शक्ती व हम सब एक है या उक्तीप्रमाणे कामे करून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले पाहिजे की, वाढत्या वयोमानानुसार देखील चांगली कामे करून गोर- गरीबांचा दुवा घेत संघटन बांधणी मजबूत केल्याचे म्हणत पाठीवर कौतुकाची थाप पडावी हीच अपेक्षा ठेवून मी पदग्रहण करतांना शपथ घेतली आहे.

समाजाच्या घरा-घरात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे काम मी माझ्या सहकार्‍यांना सोबत घेऊन पूर्णत्वास नेणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नमूद केले असून समाजासाठी मी व माझ्या समाज कार्यासाठी समाज अशी इच्छा असल्याचे शेवटी सांगितले !

- Advertisment -

ताज्या बातम्या