Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्ह्यातील कोव्हिड सेंटरमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावी

जिल्ह्यातील कोव्हिड सेंटरमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने रुग्णांच्या उपचारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कोव्हिड सेंटरमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत,

- Advertisement -

अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे.

सध्या जगभरासह देश आणि राज्यात करोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकिय कर्मचारी आणि डॉक्टरांवर ताण पडत आहे.

अशा परिस्थितीत एखाद्या रुग्णाची प्रकृती बिघडली तर त्यांना ऑक्सीजन, व्हेंटीलेटर लावण्याची गरज पडते. अशा वेळी वैद्यकीय साधने उपलब्ध नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचे अंतर दूर असल्याने वेळ जातो.

त्याचप्रमाणे रुग्णाच्या उपचारादरम्यान वापरले जाणारे विविध औषधेही उपलब्ध नसल्याने रुग्णांना तसेच नातेवाईकांना ही औषधे मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे जिल्ह्यातील कोव्हिड सेंटरमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सौ.कोल्हे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या