Friday, April 26, 2024
Homeनगरतब्बल 42 वर्षांच्या आठवणींना उजाळा

तब्बल 42 वर्षांच्या आठवणींना उजाळा

अकोले |प्रतिनिधी| Akole

बालपण ते आताचे झुकलेले म्हातारपण याचे आकलन करून, सन 1980 सालचे एसएससीचे विद्यार्थी तब्बल 42 वर्षांनी एकत्र आल्याने ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री विद्यालयात आनंद मेळा भरल्याचे भावनिक चित्र निर्माण झाले होते.

- Advertisement -

मार्च 1980 चे अनेक विद्यार्थी आज विविध पदांवर कार्यरत आहेत. काही शेती करतात तर काही व्यवसाय. या सर्व माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही एकत्र आणण्याची कल्पना दूरसंचार चे निवृत्त वरिष्ठ अधिकारी ज्ञानदेव गायकर व चास विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत जाधव या दोन माजी विद्यार्थ्यांनी मांडली व ही कल्पना प्रत्यक्षात साकारही झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त प्राचार्य व तत्कालीन वर्ग शिक्षक जनार्दन वाकचौरे यांनी भूषवले.

शांताराम बंगाळ यांनी विद्यार्थी कसा घडवला जातो याचे मार्मिक विवेचन केले. तुकाराम उगले यांनी अनेक जुन्या बाबींना उजाळा देऊन, विद्यार्थी आम्ही कसे घडवत होतो या आठवणींना उजाळा दिला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात वाकचौरे यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ब्राह्मणवाडा गावाने दिलेले प्रेम हे मीच काय पण माझा परिवार कधी ही विसरणार नाही.

याप्रसंगी डॉ. प्रा. बाळासाहेब गायकर, वैज्ञानिक दगडु गायकर, प्रगतशील शेतकरी गोकुळ गायकर, सुहास जाधव, रोहिदास आरोटे, जि. प. शिक्षक रामदास शिंदे, पुणे येथील प्रसिद्ध योगा मार्गदर्शक व उद्योजक सौ. वंदना भोर- आरोटे, मुंबई महानगर चे अधिकारी दिलीप गायकर, दूरसंचार चे माजी अधिकारी ज्ञानदेव गायकर, भरत जाधव यांनी मनोगत व्यक्त केली. व्यासपीठावर भगवंतराव पाबळे, भीमाजी आरोटे, बाबुराव गायकर, दिलीप गायकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमास माजी विद्यार्थी सहपरिवार उपस्थितीत होते. तब्बल 42 वर्षांनी भेटल्याने सर्व विद्यार्थी आनंदी दिसत होते. कार्यक्रमात सुरवातीला ज्ञानदेव गायकर यांनी श्रद्धांजली ठराव मांडला, संभाजी जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर रोहिदास आरोटे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या