Saturday, April 27, 2024
Homeनाशिकगारव्यामुळे द्राक्ष बागांत सापांचा वावर

गारव्यामुळे द्राक्ष बागांत सापांचा वावर

नाशिक | Nashik

द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत व परीसरात सध्या द्राक्ष हंगाम तेजीत सुरू झाला आहे.

- Advertisement -

त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने गारव्यासाठी द्राक्ष बागेवर सापांचा वावर वाढला असून द्राक्ष उत्पादकांना सापांच्या दर्शनाने धडकी भरली आहे.

द्राक्ष बागेत वावरताना द्राक्ष उत्पादकांनी काळजी घेण्याचे आवाहन सर्प मित्रांकडून करण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात द्राक्ष बागेतील गारवा व बाहेरील उन्हाचा तडाखा यामुळे शेतकरी मित्र असलेला साप हा द्राक्ष बागांतील गारव्यामुळे बहुतांशी द्राक्ष बागात दिसुन येत आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाने बागेत जातांना काळजी पुर्वक बघुन जावे. शक्यतो पायात बुट तसेच डोक्यावर टोपी व रात्रीच्या वेळेस बॅटरी चा वापर करावा, साप विषारी असल्यास जवळील सर्प मित्रांना माहिती देण्याचे आवाहन वन्यजीव रक्षकांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या