बापरे ; एकाच व्यक्तीला तब्बल १३ वेळा सर्पदंश

यावल – Yaval

यावल तालुक्यातील दहिगाव (Dahigaon) येथील ४० वर्षीय इसमास एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १३ वेळा सर्पदंश (Snake bite) झाला. त्यामुळे सर्पदंश झालेल्या कुटूंबात भीतीचे वातावरण असून याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

गणेश देविदास मिस्तरी (Ganesh Devidas Mistry) (सुतार) असे या इसमाचे नाव असून त्यास आतापर्यंत १२ वेळा सर्पदंश झाला असून पुन्हा काल दि.२५ मे रोजी गावातच काम करत असताना सर्पदंश झाला ही सर्पदंश झाल्याची १३ वी वेळ आहे.

सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यास तत्काळ यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी (Medical officer) व स्टाप उपचार करत असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

या एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा सर्पदंश का होत आहे याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

१३ वेळा सर्पदंश

१) दि.७ डिसेंबर २०१६

२) दि.१७ एप्रिल २०१७

३) दि.१२ मे २०१७

४) दि.२५ मे २०१७

५) दि.१४ जून २०१७

६) दि.२६ ऑगस्ट २०१७

७) दि.१४ सप्टेंबर २०१७

८) दि.१९ सप्टेंबर २०१७

९) दि.२८ सप्टेंबर २०१७

१०) दि.१२ ऑक्टोंबर २०१७

११) दि.२७ ऑक्टोंबर २०१७

१२) दि.२२ डिसेंबर २०२१

१३) दि.२५ मे २०२२


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *