Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेश"मी प्रियांका गांधींना रस्त्यावर..."; स्मृती ईराणींच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

“मी प्रियांका गांधींना रस्त्यावर…”; स्मृती ईराणींच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला पाच दिवसांचा अवधी राहिला आहे. पण त्यापूर्वी राज्यातील राजकारण प्रचंड तापलं आहे. काँग्रेसने (Congress) आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलवर (Bajrang Dal) बंदी आणण्याचं आश्वासन दिल्यानंतर कर्नाटकमध्ये त्याचे पडसाद उमटू लागले आहेत…

- Advertisement -

भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी (Priyanaka Gandhi) यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच काँग्रेस आणि भाजप आपली संपूर्ण ताकद लावून प्रचार करत आहेत.

यातच राज्यात उत्तर भारतीयांचे मत आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही पक्षातील उत्तर भारतात आपली पकड असलेले नेते प्रचारासाठी उतरले आहेत. याच दरम्यान एका वृत्त संस्थेशी बोलताना स्मृती इराणी (Smriti Irani) असं म्हणाल्या आहेत.

SCO Foreign Minister’s Meet : दहशतवाद पूर्णपणे संपायला हवा; शांघाय सहकार्य परिषदेत भारताची भूमिका

प्रियांका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) यांना नमाज पडताना पाहिलं आहे, त्या मूर्ती पूजा करत नाही, म्हणूनच त्यांचा राम मंदिराला विरोध आहे, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. स्मृती इराणी यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

काँग्रेसने एका हिंदू संघटनेची तुलना पीएफआय या आंतकवादी संघटनेशी केल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. पीएफआय ही संघटना देशातीत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी लोकांच्या भावना भडकवतात आणि त्यांना आपल्या संघटनेत सामिल करुन घेतात. पीएफआय ही अशी संघटना आहे, जी हिंदुंची हत्या घडवून आणण्यासाठी कट रचचात, अशा संघटनेशी हिंदू समुदयाची तुलना केली जाते, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.

Nashik Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! दांडका डोक्यात मारत भावाचा खून

काँग्रेस पक्ष हिंदू विरोधी असल्याचा आरोपही स्मृती इराणी यांनी केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयार केलेल्या जाहीरनाम्यावरुन हे स्पष्ट होतं, असं त्या म्हणाल्या. जो पक्ष बजरंग बलीचं नाव घेणाऱ्यांवर नाराजी व्यक्त करतात तो पक्ष किती हिंदू विरोधी असू शकतो हा विचार लोकांनी करायला हवा, असंही स्मृती इराणी यांनी म्हटलंय.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या