Friday, May 10, 2024
Homeनगर...तर नेवासा पोलीस स्टेशनला टाळे ठोकू - स्मिता अष्टेकर

…तर नेवासा पोलीस स्टेशनला टाळे ठोकू – स्मिता अष्टेकर

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा कोर्टाच्या इमारतीजवळ शारीरिक अत्याचाराची गंभीर घटना होऊनही नेवासा पोलिसांनी गेल्या पंचवीस दिवसात आरोपीवर कोणतीही कारवाई केली नाही.

- Advertisement -

सदरच्या आरोपीला त्वरीत अटक न झाल्यास नगर जिल्हा महिला शिवसेना नेवासा पोलीस स्टेशनला टाळे ठोकण्याची आंदोलन करेल असा इशारा नगर जिल्हा महिला शिवसेना आघाडी प्रमुख स्मिताताई अष्टेकर यांनी दिला. आहे यावेळेस पीडित महिला देखील त्यांच्या सोबत होती.

पत्रकारांशी बोलताना आष्टेकर यांनी सांगितले की जुलै 2017 मध्ये अहमदनगर कँटनमेंत बोर्ड विभागामध्ये कोषागार अधिकारी असलेल्या शिशिर पाटसकर याने भिंगार येथील एका महिलेस तुझ्या मुलाला नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून नेवासा येथील न्यायालयात बोलावले व न्यायालयाच्या इमारती मागे तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.

त्यानंतर 14 सप्टेंबर 2020 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सदरच्या महिलेला वेळोवेळी मुलास नौकरी लावतो असे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याचा गुन्हा नेवासा पोलीस स्टेशनला 20 नोव्हेंबर रोजी दाखल झाला.

सदरच्या गुन्ह्यातील आरोपी शिशिर पाटसकर याने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जाची आज बुधवार दि.14 रोजी नेवासा कोर्टात सुनावणी होती. परंतु या ठिकाणी पोलिसांनी कोणत्याही प्रकारची म्हणणे ठासून मांडले नाही असा आरोप स्मिता अष्टेकर यांनी केला आहे.

सदरच्या प्रकरणातील तपासी अधिकारी भरत दाते हे आरोपीला मोकळीक देताहेत. पोलिसांच्या या हलगर्जीपणा विरुद्ध शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन केले जाणार आहे. नेवासा पोलीस स्टेशनला नगर जिल्ह्यातील महिला शिवसैनिक येऊन टाळे ठोकणार असल्याचा इशारा त्यानी दिला.

या प्रकरणातील आरोपी शिशिर पाटकर हा आर्थिक फसवणूक करण्यामध्ये सराईत गुन्हेगार आहे. त्याने अनेक तरुणांना भारत सरकारच्या मिलेक्ट्री सेंटर व कॅन्टोमेंट विभागात शासकीय नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्यासाठी पैसेही हडप लेले आहेत व या बाबतीत नेवासा पोलीस स्टेशनला 7 मे 2017 रोजी त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.

सदरच्या प्रकरणात आरोपीने तक्रार करणार्‍या कडुनघेतलेल्या पैशांपैकी काही पैसे परत ही दिले होते. फसवणूक गुन्ह्याचे सूनवाई दरम्यान त्याच्या नेवासा कोर्टात चकरा होत होत्या त्यावेळेस त्याने या महिलेला नेवासा कोर्टात बोलावले व अत्याचाराचा गुन्हा केला आहे असेही स्मिता अष्टेकर यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर काहीच न केल्यामुळे आपण स्मिता अष्टेकर यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतल्याचे पीडित महिलेने सांगितले.

आरोपीला अटक करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न – दाते

या घटनेतील आरोपीला जमीन देऊ नये अशीच बाजू कोर्टापुढे मांडलेली आहे.आरोपीचा वेळोवेळी शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही, त्याला शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी आमचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.

– भरत दाते, उपनिरीक्षक तपासी अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या