Friday, April 26, 2024
Homeनाशिकसगीर व फरजाना शेख यांना स्मार्ट शिक्षक पुरस्कार

सगीर व फरजाना शेख यांना स्मार्ट शिक्षक पुरस्कार

जुने नाशिक l Old Nashik (प्रतिनिधी) :

नाशिक महापालिका शिक्षण मंडळाच्या उर्दू माध्यमातील शाळांचे केंद्र प्रमुख सगीर शेख व शिक्षिका फरजाना शेख यांना बंगळूरु येथील राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक आगाज संस्थेतर्फे स्मार्ट शिक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे.

- Advertisement -

करोनामुळे या दोघा पुरस्कार्थींपर्यंत त्यांचे प्रमाणपत्र नुकतेच पोहोचविण्यात आले आहे.

केंद्र प्रमुख सगीर शेख व शिक्षिका श्रीमती फरजाना शेख या नवराबायको जोडीने उर्दू व सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय सफा एज्युकेशनल ऑनलाइन ग्रुपची निर्मिती केली असून या ग्रुपवरून सुमारे चार हजार विद्यार्थी व पाचशे शिक्षक शिक्षिका जोडले गेले आहेत.

या ग्रुपवरून दररोज सर्व विषयांचे अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण दिले जाते. तसेच जयंती पुण्यतिथी व विविध सणानिमित्त स्पर्धांचे आयोजन केले जातात.

आठवड्यातून एक दिवस चाचणी घेतली जाते व ही सर्व सेवा मोफत पुरविली जाते, अशी माहिती ग्रुपचे संस्थापक सगीर शेेख यांनी दिली आहे. या दोघांना पुरस्काराबद्दल मनपा शाळेतील शिक्षक वृंदातर्फे आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या