Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यास्मार्ट पार्किंग : एकीकडे शिस्त; दुसरीकडे बेशिस्त

स्मार्ट पार्किंग : एकीकडे शिस्त; दुसरीकडे बेशिस्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील ( Nashik City ) काही महत्वाच्या ठिकाणी असलेल्या स्मार्ट पार्किंगबाबत ( Smart Parking ) गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान, खतीब डेअरी परिसरात शिस्तीत तर एम जी रोड, जिल्हा परिषद मार्ग आदी ठिकाणी वाहने बेशिस्तीने पार्क केल्याचे देशदूत पार्किंग वॉचमध्ये ( Deshdoot Parking Watch ) आढळून आले आहे.

- Advertisement -

स्मार्ट सिटी कंपनी ( Smart City Company )अंतर्गत खासगी ठेकेदाराकडून 2 वर्षांपूर्वी ही पार्किंग सुरू करण्यात आली होती. यामध्ये डिजिटल बोर्ड, मोबाईल ऍप्लिकेशन तसेच ऑनलाइन पेमेंट या सारख्या स्मार्ट सुविधांचा अंतर्भाव होता. या सुविधांमुळे नागरिकांना मोबाईलवर आपल्या वाहनासाठी पार्किंग स्लॉट बुक करता येणार होता. मात्र, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 23 मार्च 2020 पासून ही व्यवस्था बंद करण्यात आली होती.

सद्यस्थितीत रस्त्यांच्या बाजूला लावलेल्या पट्ट्यांमध्ये शहरातील उच्चभ्रू वस्तीमधील गंगापूर रोडवरील रस्त्यांवर शिस्तीत वाहने पार्क केलेली असल्याने वाहतुकीचा प्रश्न तयार होत नाही. मात्र, त्याच वेळी शहरातील बाजारपेठेनजीक असलेल्या महत्वाच्या महात्मा गांधी रोड, जिल्हा परिषद मार्ग आदी ठिकाणी वाहने अस्तव्यस्त पद्धतीने पार्क केलेली असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यात भरीस भर म्हणजे स्मार्ट सिटीने सुरू केलेले खोदकाम डोकेदुखी ठरत आहे.

ज्या ठिकाणी नागरिकांनी शिस्तीत वाहने पार्क केली आणि ज्या ठिकाणी अस्तव्यस्त पद्धतीने केली असल्याचे समोर आले आहे. भविष्यात स्मार्ट प्रणाली विकसित झाली तर नागरिक या प्रणालीचा सकारात्मक वापर करतील का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

स्मार्ट पार्किंग व्यवस्था लवकरच

याबाबत स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना काळात थांबविण्यात आलेली स्मार्ट पार्किंग व्यवस्था लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार देखील पूर्ण झाला असून येत्या काही आठवड्यात ही प्रणाली सुरु होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या