Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक...म्हणून आजचा दिवस असतो सर्वात स्पेशल, सर्वात लहान

…म्हणून आजचा दिवस असतो सर्वात स्पेशल, सर्वात लहान

नाशिक | प्रतिनिधी

२१ डिसेंबर रोजी रात्र ही वर्षातील सर्वात मोठी असते. आजची (२१ डिसेंबर २०२०) रात्र साधारण १३ तासांची आहे. याबाबतची माहिती खगोल अभ्यासक सुजाता बाबर यांनी ‘देशदूत’शी बोलताना माहिती दिली…

- Advertisement -

त्या म्हणाल्या, आजच्या दिवसानंतर सूर्य हा मकर तारकासमूहात प्रवेश करीत आहे. हा दिवस सायन मकर संक्रांत म्हणून मानला जातो.

ही कालगणनेमध्ये पाश्चिमात्य पध्दतीप्रमाणे मानली गेली आहे. या दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होते. शिशिर ऋतूला सुरुवात होते. दिवस हळूहळू मोठा व्हायला लागतो. आपल्या भारतीय कालगणनेत म्हणजे निरयन पंचांगाप्रमाणे हा दिवस १४ जानेवारीला असतो.

सूर्याच्या भासमान मार्गाला आयनिक वृत्त किंवा क्रांतीवृत्त असे म्हणतात. पृथ्वीचे विषुववृत्त पुढे वाढवले तर ते क्रांतीवृत्तास दोन ठिकाणी छेदते.

दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना असणाऱ्या छेदनबिंदूला वसंत संपात बिंदू (Vernal Equinox) असे म्हणतात. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना असणाऱ्या छेदनबिंदूला शरद संपात बिंदू (Autumnal Equinox) असे म्हणतात.

या दोन्ही दिवशी रात्र व दिवस समान असतात. शरद संपात बिंदूनंतर सूर्य हळूहळू दक्षिणेकडे जायला लागतो. व तो जेव्हा अति दक्षिणेला असतो त्या बिंदूला अवष्टंभ बिंदू असे म्हणतात. इंग्रजीमध्ये winter solstice असे म्हणतात.

२१ डिसेंबर रोजी सूर्य अति दक्षिणेला उगवतो व अति दक्षिणेला मावळतो. अवष्टंभ बिंदू ओलांडल्यावर सूर्याचे उदय व अस्त हे उत्तरेकडे सरकायला लागतात. थंडी कमी होऊ लागते. विशेष म्हणजे या वर्षी याच दिवशी गुरू व शनी ग्रह एकमेकांच्या अत्यंत जवळ दिसणार आहेत. याला महायुती असेही म्हटले जाते. हा योग सुमारे ८०० वर्षांनी आला आहे.

पृथ्वी ही साडे २३ अंशाने कललेली असल्याने संपात बिंदू पश्चिमेकडे सरकत असतात. हे अंतर ५०.२ विकला असते. पूर्ण फेरी ३६० अंश असते. याचा ३६०वा भाग म्हणजे एक अंश, अंशाचा ६० वा भाग म्हणजे एक कला.

कलेचा ६०वा भाग म्हणजे एक विकला. यामुळे सायन तारकासमूहांचे भाग व तारे यांच्यात फरक दिसतो. यामुळे भारतीयांची मकर रास (निरयन) कालगणनेनुसार मानली जाते. मकर दहावी रास असल्यामुळे तिची सुरूवात राशीचक्राच्या आरंभबिंदूपासून २७० अंशांवर होते.

सूर्य जेव्हा या बिंदूवर येतो तेव्हा त्याचा मकर राशीत प्रवेश होतो. ही तारीख गेली काही वर्षे १४ जानेवारीला येते. त्यादिवशी आपण मकर संक्रांती साजरी करतो. उत्तरायणाचा प्रारंभ मानतो. परंतु २१ डिसेंबर आणि अवष्टंभ बिंदूचे देखील उत्तरायणात महत्त्वाचे स्थान आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या