हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रावरील सेटलिंग टँकमध्ये गाळ

jalgaon-digital
1 Min Read

धुळे ।Dhule प्रतिनिधी

शहरातील निम्म्याभागात हनुमान टेकडी (Hanuman Hill) जलशुध्दीकरण केंद्रावरुन (water treatment plant) पाणीपुरवठा (Water supply) केला जातो. त्या केंद्रावरील क्लॉरीफॅक्यूलेटर टँक (सेटलिंग टँक) (Chlorifaculator tank) मध्ये गाळ (Mud) साचल्यामुळे पाणी शुध्दीकरण प्रक्रियेस अडचणी निर्माण होत आहे. अशी माहिती महापालिकेचे (Municipal Corporation) अभियंता कैलास शिंदे (Engineer Kailas Shinde) यांनी दिली आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेवरील हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रावरील क्लॉरीफॅक्यूलेटर टँक (सेटलिंग टँक) मध्ये बर्‍याच प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणी शुध्दीकरण प्रक्रिया करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे क्लॉरीफॅक्यूलेटर टँकमधील गाळ काढणे व सफाई करणे हे आवश्यक आहे. टँकमधील गाळ दि. 26 जून रोजी काढण्यात येणार आहे.

गाळ काढण्यात येणार असल्यामुळे जलशुध्दीकरण केंद्रावरुन रामनगर, अशोकनगर, सिमेंट जलकुंभ भागातील पाणीपुरवठा दि. 26 जून रोजी बंद राहिल. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.

यंदा गाळ काढण्यास उशीर

दरवर्षी पावसाळ्यापुर्वी क्लॉरीफॅक्यूलेटर टँकमधील गाळ काढला जातो. यंदा पावसाळा सुरु झाल्यानंतर टँकमधील गाळ काढण्यात येत आहे. त्यामुळे काही भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *