Saturday, May 11, 2024
Homeधुळेऑप्शन फॉर्म : ऑनलाइन प्रक्रिया धिम्यागतीने

ऑप्शन फॉर्म : ऑनलाइन प्रक्रिया धिम्यागतीने

रामकृष्ण पाटील ,कापडणे :

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना, द्याव्या लागणार्‍या परीक्षेसाठी विकल्प अर्ज सादर करावा लागतो. परंतू ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी असलेली प्रक्रिया कासवगतीने चालत असल्याने परीक्षेपासुन वंचित राहण्याची भिती विद्यार्थ्यांमधुन व्यक्त होत आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या कठिण काळातही विद्यार्थ्यांना यामुळे आपले महाविद्यालय गाठावे लागत आहे. अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांना विकल्प निवडण्यासाठी अडचणी आल्या त्यांना तो निवडण्याची संधी द्यावी तसेच ज्यांचा ऑप्शन फॉर्मची मुदत अजुन वाढवावी अशी मागणी विद्यार्थ्यी वर्गातून होत आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अंतिम सत्राच्या परीक्षांना विरोध करणार्‍या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा होणारच असा निर्णय नुकताच दिला. यानंतर विद्यापीठांची परीक्षाबाबत लगबग सुरु झाली.

यातच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अनुषंगाने विकल्प अर्ज सादर करावेत असे आवाहन केले. सुरुवातीला ऑनलाईन विकल्प (ऑप्शन) अर्ज भरण्यास दि.15 सप्टेंबर पावेतो मुदत देण्यात आली.

विद्यार्थ्यांना येत असलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करता, विकल्प भरण्यास दि.17 सप्टेंबर पावेतो व दि.19 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यात परीक्षेसाठी प्रविष्ठ होणार्‍या सर्वच अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन विकल्प सादर करावयाचा होता. हा विकल्प भरतांना मात्र विद्यार्थ्यांना असंख्य अडचणी आल्या.

महाविद्यालयांना जावुन ऑॅप्शन फॉर्म भरणार्या विद्यार्थ्यांना ऑॅफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही पध्दतीचे पर्याय उपलब्ध होते परंतू ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांना जाता आले नाही त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला, या ऑनलाईन पध्दतीने ऑप्शन फॉर्म भरणार्या काही विद्यार्थ्यांना मात्र विकल्प हा दिसतच नाही.

तसेच सदर साईट अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. ज्यात ऑप्शन वा विकल्पच नाही तो कसला आला ऑप्शन फार्म असा संतप्त सवाल विद्यार्थ्यी वर्गातून विचारला जात आहे. अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांना अजुनही विकल्प निवडता आला नाही त्यांच्यासाठी पुन्हा दोन दिवस संधी दिली असली तरी या विद्यार्थ्यांना कोरोना काळातही महाविद्यालय गाठावे लागणार आहे. यात अजुन 22 तारखेपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या