Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिकरोड : लवकरच सरकते जिने कार्यान्वित होणार

नाशिकरोड : लवकरच सरकते जिने कार्यान्वित होणार

नाशिकरोड । Nashik

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर विविध कामे सुरु असून निरनिराळे बदल होत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर सरकते जीने होत असून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जुन्या तिकीट घरच्या वरच्या मजल्यावर चारशे लोक आराम करू शकतील असा हॉल बांधण्यात येत आहे.

- Advertisement -

नाशिकरोड रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातले प्रमुख रेल्वे स्थानक समजले जाते. या ठिकाणी रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. इतर राज्यातही जाण्यासाठी नासिकरोड रेल्वेस्थानकावर गाड्या थांबतात. सध्या तिकीट घराच्या पहिल्या मजल्यावर चारशे लोक थांबू शकतील असा हॉल बांधण्यात येत आहे.

प्रवाशांची सुरक्षितता व स्वच्छता राखली जावी या उद्देशाने हा मोठा हॉल लवकरच कार्यान्वित होत असून या हॉलमध्ये महिला व पुरुषांची वेगळी सोय करण्यात आली आहे. पॅसेजमध्ये मुलांना खेळण्याची सोय करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर सरकते जिन्याची निर्मिती केली जात आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सरकते जिने दीड वर्षापूर्वीपासून बसवलेली आहेत. मात्र चारवर सरकते जिने नसल्यामुळे अनेकवेळा गरोदर माता, वृद्ध व्यक्ती, दिव्यांग बांधवांची फरफट होत होती. त्यामुळे सरकते जिने प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर कार्यान्वित होत असून लवकरच प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध होणार आहे.सरकते जिने लवकरच कार्यान्वित होणार

- Advertisment -

ताज्या बातम्या