Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेरात कत्तलखाने बंद करण्यात पोलिसांना अपयश

संगमनेरात कत्तलखाने बंद करण्यात पोलिसांना अपयश

संगमनेर (शहर प्रतिनिधी)-

राज्यात गोवंश जनावरांची हत्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असताना संगमनेरात छुप्या पध्दतीने कत्तलखाने सुरू झाले आहेत. या कत्तलखान्यांमधून दररोज अनेक जनावरांची कत्तल होते व हे मांस मुंबई-ठाण्याकडे जात असताना हे कत्तलखाने बंद करण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

- Advertisement -

अवैधरित्या चालविले जाणारे कत्तलखाने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पदभार स्विकारताच पूर्णपणे बंद करण्यात आले होते. देशमुख यांची मुख्यालयात बदली होताच कत्तलखाने चालकांनी पुन्हा डोके वर काढले होते. कत्तलखाने लपून-छपून सुरू झाले आहेत.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास शहरातील जोर्वेनाका परिसरात कत्तलीसाठी 50 जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. अशा प्रकारच्या सातत्याने कारवाया होत असतानाही हा व्यवसाय बंद का होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. रात्री-अपरात्री हे कत्तलखाने कोणाच्या आशिर्वादाने सुरू झाले आहेत.

कत्तलखाने चालकांना कोणाचे अभय मिळत आहे. जनावरे पुरविणार्‍यांवर पोलीस कारवाई का करत नाही, पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कत्तलखान्यांमध्ये कतलीसाठी जाणारे जनावरे पकडूनही कत्तलखान्यात गोहत्या कशी केली जाते. याबाबत शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

अनेक अधिकारी संगमनेरात आले व गेले. अधिकार्‍यांनी कधीही कत्तलखाने कडक बंद केले नव्हते. कत्तलखान्यांना कत्तली करण्याची परवानगी नसतानाही गोहत्या करतात कसे? संघटनांनी अनेक वेळा निवेदने देऊनही या निवेदनांकडेही अधिकार्‍यांकडून डोळेझाक का होत असते. कत्तलखाना चालकांनी आता काही अधिकार्‍यांना हाताशी धरून आपला व्यवसायात तेजीत सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या