Friday, April 26, 2024
Homeनगरकत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या जनावरांची तोफखाना पोलिसांनी सुटका केली आहे. अहमदनगर शहरातील कोठला झोपडपट्टीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तौफिक जाफर शेख (रा. घास गल्ली, कोठला) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सहाय्यक फौजदार गिरीष केदार यांनी फिर्याद दिली आहे. कत्तल करण्याचे उद्देशाने जनावरे डांबून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कोठला भागामधील एका गोडाऊनवर छापा टाकला. या ठिकाणी चार जर्सी गाई, एक गावरान गाई, दोन बैल तसेच वासरू असा सुमारे एक लाख 25 हजार रुपये किंमतीची जनावरे आढळून आली.

सहाय्यक फौजदार केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तौसिक शेख याच्याविरूध्द महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या