Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रMonsoon 2022 : यंदा महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? काय सांगतोय 'स्कायमेट'चा अंदाज?

Monsoon 2022 : यंदा महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? काय सांगतोय ‘स्कायमेट’चा अंदाज?

मुंबई | Mumbai

शेतकऱ्यांसाठी (Good news for Farmers) एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे स्कायमेट (Skymet) या खासगी हवामान संस्थेने (Private meteorological organization) यंदाचा मान्सूनचा (Monsoon 2022) अंदाज वर्तवला आहे. या सालात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज स्कायमेटने सांगितला आहे.

- Advertisement -

Skymet च्या अंदाजानुसार भारतामध्ये या वर्षी सरासरी ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच यावर्षी आपल्याकडे मान्सून ‘सामान्य’ राहण्याची शक्यता आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात पावसाळा असतो. (Monsoon 2022 Forecast)

यंदा मान्सूनची सुरुवात चांगली होईल आणि जून महिन्यातच जास्तीत जास्त पाऊस अपेक्षित आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असून मान्सून त्यांच्यासाठी चांगला असेल, कारण सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल, यामुळे शेतकऱ्यांना खूप मदत होईल.

दरम्यान, २०२१ मध्ये देशात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली पिके घेता आली होती. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचाही मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या