Monsoon Update : मान्सूनबाबत ‘स्कायमेटने’ वर्तवला ‘हा’अंदाज

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील जनतेला उन्हाचे चटके सोसावे लागत आहे. त्यामुळे मान्सूनची वाट पाहिली जात असून मान्सूनबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. यावर्षी देशात मान्सून (Monsoon 2023) उशीरा दाखल होईल असा अंदाज स्कायमेट वेदर (Skymet Weather Update) या खासगी संस्थेने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे….

मान्सून अंदमानमध्ये साधारणता २२ मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा त्याची सुरुवात कमकुवत दिसत आहे. त्यामुळे यंदा मान्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. साधारणतः केरळमध्ये मान्सून १ जूनपर्यंत दाखल होत असतो. मात्र नैऋत्य मान्सूनसंदर्भात आताच सांगणं कठीण असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोकसभेसाठीच्या जागांचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला? महत्त्वाची माहिती आली समोर

त्यानुसार तळकोकणात मान्सून ७ जून रोजी दाखल होईल. तर मुंबईमध्ये ११ जूनला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी स्कायमेटच्या आधीच्या अंदाजानुसार मान्सून जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९४ टक्के कोसळणार आहे. तर हवामान विभागानुसार या काळात ८३.५ मिमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के होणार आहे. तसेच मोचा चक्रीवादळ आणि बदललेल्या वातावरणामुळे मान्सून दाखल होण्याची तारीख पुढे गेल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानात सीमावादावरून राडा; १६ जणांचा मृत्यू

तर अंदमानमध्ये मान्सून उशिरा दाखल होणार असल्यामुळे केरळमध्ये देखील तो उशीरा दाखल होणार आहे. मोचा चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होत चालली आहे त्यामुळे त्याचा परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर होत आहे. या चक्रीवादळामुळे मान्सून अंदमानात उशीराने दाखल होणार असल्यामुळे त्याच्या पुढच्या दिशेच्या वाटचालीवर परिणाम होण्याचे सांगितले जात आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची गृहमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल; दिले ‘हे’ आदेश

स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.तर भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज, त्यामुळे पेरणीला देखील उशील होऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *