Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedडबल डेकर उड्डाणपुलातून 'ऑरिक सिटी'ला वगळले

डबल डेकर उड्डाणपुलातून ‘ऑरिक सिटी’ला वगळले

औरंगाबाद – aurangabad

शेंद्रा ते वाळूज एमआयडीसी (midc) दरम्यान २८ किलोमीटरची मेट्रो धावण्यासाठी अखंड डबल डेकर उड्डाणपूल (Double decker flyover) तयार करण्याचा आराखडा बनविण्यात आला. प्रस्तावित आराखड्यातून मात्र ऑरिक सिटीला (Auric City) वगळण्यात आल्याबद्दल उद्योजकांमधून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. एकीकडे समृद्धी महामार्गाला (Highway) ऑरिक सिटीची कनेक्टीव्हिटी देण्याची तयारी केली जात आहे तर दुसरीकडे मेट्रोपासून दूर ठेवण्याचा डाव आखण्यात आल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ…

शहरातील वाहतूक व्यवस्थेला गतिमान करण्याच्या दृष्टीने शेंद्रा ते वाळूज एमआयडीसीदरम्यान मेट्रो प्रकल्प राबविण्याचे नियोजित आहे. त्याकरिता स्मार्ट सिटीने महामेट्रोला डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महामेट्रोने मेट्रोचा प्राथमिक स्वरूपात डीपीआर तयार केला असून, त्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. मेट्रोसाठी शेंद्रा ते वाळूज एमआयडीसीदरम्यान अखंड डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यासाठी आराखडा बनविण्यात आला आहे. यामध्ये २४ कि.मी. पर्यंत उड्डाणपूल आणि चार कि.मी. मध्ये जमिनीवरून राबविण्याचा विचार आहे. यामध्ये २२ स्टेशन्स राहणार असून, आठ ठिकाणी रॅम्पची व्यवस्था केली जाणार आहे. नियो मेट्रोसाठी हा आराखडा राबविला जाणार आहे. शेंद्रा एमआयडीसीच्या गेट क्र. एकपासून मेट्रो धावणार आहे. शेंद्रा एमआयडीसीला लागूनच चार हजार एकर जमिनीवर ऑरिक सिटी उभारण्यात आली आहे. ऑरिकमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे दीडशेपेक्षा जास्त उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. शेंद्रा ते करमाडपर्यंत ऑरिक सिटीचे जाळे असणार आहे.

करमाडच्या रोहिदासनगरजवळ ऑरिक सिटीचे पहिले गेट उभारण्यात आले आहे. ऑरिक सिटीला केंद्र सरकारचे पाठबळ असून, निधीची कमतरता भासलेली नाही. केवळ सहा कि.मी. अंतर वाढत असल्याने मेट्रोतून ऑरिक सिटीला वगळण्यात आले आहे. याबाबतीत आमदार हरिभाऊ बागडे यांनी मेट्रोमध्ये ऑरिक सिटीचा समावेश करण्याची सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या