Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवन महोत्सवात सहा हजार वृक्षांची लागवड

वन महोत्सवात सहा हजार वृक्षांची लागवड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना संकटामुळे यंदा राज्यात वृक्ष लागवड मोहीम होणार नसली तरी पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन १ ते ७ जुलै या कालावधीत झालेल्या वनमहोत्सवात सहा वृक्षांची लागवड केली. जे शासकिय विभाग, सामाजिक संस्था वृक्षारोपण करु इच्छितात त्यांना सामाजिक वनीकरण विभागाकडून सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यामाध्यमातून हिरवेगार नाशिकचे स्वप्न प्रत्यक्षात अंमलात आणले जात आहे.

- Advertisement -

राज्यशासन क्रांतीवीर वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत पुढील पाच वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करणार होते. मात्र करोना संकटामुळे या स्वप्नावर पाणी फेरले. दरवर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्षारोपण मोहिम राबवली जाते. त्यासाठी ३१ मार्च पर्यंत वृक्षारोपणासाठी खड्डे खोदले जातात. रोप वाटिकेत लाखोंच्या संख्येने रोपे उगवली जातात. पण करोनामुळे राज्यभरात ही मोहीम राबविता आली नाही. वन खात्याकडुन जिल्ह्यांना कोणतेही वृक्षारोपणाचे उदिष्ट देण्यात आले नाही. करोनाचे संकट लक्षात घेता मोठया नाहिपण स्थानिक पातळिवर वृक्ष लागवड करावी असे आदेश देण्यात आले होते.

त्यानूसार १ ते ७ जुलै या वनमहोत्सव कालावधीत सामाजिक वनीकरण, विविध शासकिय विभाग व सामाजिक संस्था यांनी सहा हजार वृक्षांची लागवड केली. शिलापूर या गावात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वृक्षारोपण केले. नागरिकांनी व शासकिय आणी निमशासकिय विभागांना वृक्षारोपणासाठी सवलतीच्या दरात सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपे उपलब्ध करुन दिली जात आहे.

एका छोटया रोपाची किंमत १५ रुपये इतकी असून ते आठ रुपये सवलतीच्या दरात दिले जाते. तर मोठया रोपाची किंमत ७० रुपये असून ते ४० रुपये सवलतिच्या दरात उपलब्ध करुन दिले जात आहे. ज्यांना पैसे देऊन विकत घेणे शक्य नाही अशा शासकिय विभागांनी पत्र दिल्यास त्यांना मोफत रोपे दिली जात आहे. करोनामुळे वृक्षलागवड मोहिमेत खंड नको पडायला हा महत्वाचा उद्देश आहे. वड, पिंपळ, चिंच, सिताफळ, औंदुबर ही भारतीय प्रजातीची वृक्षांची लागवड केली जात आहे.

करोना संकटामुळे यंदा जिल्ह्याला वृक्ष लागवडिचे टार्गैट मिळाले नाही. १ ते ७ जुलै या कालावधीत झालेल्या वनमहोत्सवात 6 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासाठी सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करुन दिली आहे.

– चंद्रकांत भारमल (विभागीय वन अधिकारी, नाशिक सामाजिक वनीकरण)

- Advertisment -

ताज्या बातम्या