Friday, April 26, 2024
Homeनगरसहा महिन्यांपासून करंजी आरोग्य सेविकाविना

सहा महिन्यांपासून करंजी आरोग्य सेविकाविना

करंजी |वार्ताहर| Karanji

करोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असून करोनाची दुसरी लाट राज्यात आली आहे. जिल्ह्यासह पाथर्डी तालुक्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत

- Advertisement -

असताना तालुक्यातील मोठी लोकसंख्या असणार्‍या करंजी गावाला सहा महिन्यांपासून आरोग्यसेविका नाही. त्यामुळे नागरिकांमधून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकार्‍यांची डोळेझाक होत असल्यानेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकेचे पद सहा महिन्यांपासून रिक्त आहे.

पाच वर्ष आरोग्य सेविका म्हणून करंजीत उत्कृष्ट काम करणार्‍या आरोग्य सेविका सीमा अकोलकर यांची शेवगाव तालुक्यात प्रशासकीय बदली झाल्यापासून करंजी येथील आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. देवराई उपकेंद्राच्या आरोग्य सेविकेला करंजी उपकेंद्राचा तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे.

त्यादेखील आठवड्याभरातून एकदा करंजी आरोग्य केंद्रात येऊन जातात. आधीच्या आरोग्यसेविका अकोलकर यांनी सलग दोन वर्षे उत्कृष्ट आरोग्य सेविका म्हणून तालुका आरोग्य विभागाने सन्मानित केले. त्यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर इतर आरोग्य सेविका येईपर्यंत त्यांना पद मुक्त कसे होऊ दिले. स्थानिक नेते मंडळी याबाबत का गप्प राहिले.

अकोलकर यांच्या आरोग्य सेवेविषयी करंजी गावासह सातवड, भोसे, दगडवाडी, कानोबावाडी, खंडोबावाडी येथील ग्रामस्थ समाधानी होते. वर्षभर कोवीडच्या भयानक कार्यकाळात अकोलकर यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन करोनाबाबत जनजागृती केली, असे समाजहिताचे काम करणार्‍य कर्मचार्‍यांची इतरत्र बदली झाल्याचे समजल्यानंतर त्यास स्थानिक नेतेमंडळींनी विरोध करणे गरजेचे होते.

मात्र, तसे झाले नाही. यामुळे आता करंजीला कधी पूर्णवेळ आरोग्य सेविका मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या