Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर : चाकूचा धाक दाखवून सहाशे कोंबड्या पळवल्या

सिन्नर : चाकूचा धाक दाखवून सहाशे कोंबड्या पळवल्या

वावी | Wavi

चाकूचा धाक दाखवून शुक्रवारी (दि. ०४) रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सहाशे कोंबड्या चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.

- Advertisement -

जी एम पोल्ट्री फार्मच्या अधिपत्याखाली रांजणगाव येथील शेतकरी अण्णासाहेब खालकर या शेतकऱ्यास पक्षी वाढविण्यास दिले होते. रात्री उशिरा या शेतकऱ्याने मुंबई येथील kjes ट्रेडर्स या कंपनीला कोंबड्या विकल्या होत्या.

सदर कोंबड्या पिकअप वाहन चालक फिरोज खान व त्याच्या बरोबर असणारा त्याचा मित्र अनवर हे रात्री 11 वाजेच्या सुमारास निमोण – नांदूर रस्त्याने जात असताना अज्ञात मोटारसायकल स्वरांनी पिकअप MH04 JK 8448 हिस अडवून चाकूचा धाक दाखवून वाहन चालकास व त्याचा साथीदार यास डोळ्याला पट्टी बांधून या चोरट्यांनी चालक सहित गाडी अज्ञात ठिकाणी नेली.

तशी फिर्याद वाहन चालक फिरोज खान यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर पिक अपमध्ये जीपीआर एस सुविधा असून सदर चोरट्यांनी कोंबड्या पांगरी शिवारात खाली केल्याचे त्यावरून समजले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या