Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : गोदाकाठावर चाललंय तरी काय?; 'पाहा' सद्यस्थितीचा आढावा...

Video : गोदाकाठावर चाललंय तरी काय?; ‘पाहा’ सद्यस्थितीचा आढावा…

नाशिक । Nashik

काल जिल्ह्यासह शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) गोदावरीला (Godavari) पूर (Flood) आला होता. तसेच गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणी पातळीत वाढ झाल्याने काल धरणातून पाण्याचा विसर्ग (Water Discharged) करण्यात आला होता..

- Advertisement -

त्यामुळे येथील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यातच आज शहरासह ग्रामीण भागात पाऊस कमी असला तरी गोदावरीच्या पाण्याची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे पाहायला मिळत आहे.

कालच्या तुफान पावसामुळे गोदातीरावरील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली होती. तसेच रामसेतू पूल देखील पाण्याखाली गेला होता. तर दुतोंड्या मारुतीच्या तोंडापर्यंत पाणी लागले होते. कालच्या या पुरामुळे कुठलाही व्यक्ती बाहेर निघाला नव्हता.

परंतु आज पाऊस कमी असल्याने गोदातीरावरील पूर बघण्यासाठी कॉलेजच्या मुला-मुलीसंह, काही कुटुंबीयां आपल्या लहान मुलांना घेऊन गर्दी केली होती.

दरम्यान, गिरणारे, गंगापूर, या भागात काही प्रमाणात पाऊस सुरु असून त्या पाण्याचा प्रवाह गोदावरीत येत असल्याने हे पाणी वाहत खाली येत आहे. त्यामुळे अजूनही गोदातीरावरील पाणी कमी झालेले नसून परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या