Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसिताराम कुंटेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले...

सिताराम कुंटेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले…

मुंबई | Mumbai

माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडी (ED) चौकशीदरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत….

- Advertisement -

सिताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची (Transfers) अनधिकृत यादी पाठवत असल्याचा आरोप त्यांनी यांनी केला आहे. ईडीने सिताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला असता त्यांनी पोलीस विभागाच्या बदलीबाबत ही धक्कादायक माहिती दिली आहे.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना विशिष्ट पोलीस अधिकारी किंवा विशिष्ट पदांवरील बदल्यांची एक अनधिकृत यादी पाठवत होते. ते आपले खासगी सचिव संजीव पालंडे यांच्यामार्फत ही यादी पाठवायचे. ही यादी मला माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळत होती. मी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात काम करत असल्याने मी या यादीला नकार देऊ शकत नव्हतो, अशी माहिती सीताराम कुंटे यांनी ईडीला दिल्याचे समजते.

अनिल देशमुख यांनी पाठवलेली अनधिकृत बदलीची यादी पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या (PEB) सर्व सदस्यांना दाखवली जात होती. या सर्व सदस्यांना यादी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठवल्याचे संगीतले जात होते. यानंतर ही यादी अंतिम आदेशात समाविष्ट केली जायची, असेही ते म्हणाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या