Thursday, April 25, 2024
Homeजळगावखंडणी प्रकरणातील एसआयटी समिती वादाच्या भोवऱ्यात

खंडणी प्रकरणातील एसआयटी समिती वादाच्या भोवऱ्यात

जळगाव jalgaon

बीएचआर प्रकरणातील (case of BHR) तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण (Adv. Praveen Chavan)यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाचे गठीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एलसीबीच्या पोलीस निरीक्षकांकडे (Inspector of Police, LCB) दिला होता. परंतु अचानक या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे (SIT) देण्यात आला. या समितीमध्ये वादग्रस्त कर्मचाऱ्यांचा (disputed employees) समावेश असल्यामुळे एसआयटी वादाच्या भोवऱ्यात (controversy) सापडले असून यात राजकीय हेतू असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू होती.

- Advertisement -

  बीएचआरच्या दाखल गुन्ह्यात झंवर परिवाराला मदतीच्या बदल्यात कोट्यावधीची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण पंडित चव्हाण (रा. सुमंगल अपार्टमेंट, मोदीबाग, शिवाजीनगर, पुणे), शेखर मधुकर सोनाळकर (रा. नयनतारा अपार्टमेंट जळगाव), उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव)  यांच्या विरुद्ध सूरज सुनील झंवर (वय- ३२, रा. साई बंगला, सुहास कॉलनी, जळगाव) यांनी याबाबत डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये १ कोटी २० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती.

त्यानुसार सुरुवातीला डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. *एलसीबी कडून तखंडणीची रक्कम चाळीसगाव येथे देण्यात आल्याने हा गुन्हा पुण्यातून जळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेमार्फत करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे तपास देण्याची नोंद करण्यात आली.

परंतु हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कडून या गुन्ह्याचा तपास काढून घेत. त्याचा तपासासाठी एसआयटी गठीत केल्यामुळे अनेक चर्चा पोलीस दलात सुरू होत्या.

वादग्रस्त कर्मचाऱ्यांमुळे एसआयटीची चर्चा

पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हे. कॉ. विजय पाटील, नरेंद्र वारुळे, नाईक जीवन पाटील व मनोज सुरवाडे यांचा समावेश आहे. या सहा जणांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. परंतु यातील दोघ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची तर एकावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील मॅसेज पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

या कर्मचाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश असल्याने त्याची चर्चा पोलीस दलात रंगली होती. 

राजकीय दबावामुळे समिती गठीत

बीएचआर प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात थेट एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. राजकीय दाबावामुळे एसआयटी स्थापन झाल्याची चर्चा जोरदार चर्चा सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या