Friday, April 26, 2024
Homeजळगावभाऊबीजेच्या सायंकाळीच बहीण-भावाचे विष प्राशन

भाऊबीजेच्या सायंकाळीच बहीण-भावाचे विष प्राशन

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

बहिण-भावाच्या अनोख्या नात्याचा सण असलेल्या भाऊबिजेच्या सायंकाळीच तालुक्यातील भोलाणे येथील 21 वर्षीय भावाने नैराश्येतून विष घेतले. तर अगदी दहाच मिनीटाच्या अंतराने बहिणीनेही विष घेवून आत्महत्त्येचा प्रयत्न केला.

- Advertisement -

दरम्यान उपचारादरम्यान दुर्वेवी बहिणीचा मृत्यू झाल्याची तर भाऊ अत्यवस्थ अवस्थेत मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना सोमवारी सायंकाळी भोलाणे येथे घडली.

भोलाणे येेथील सेवानिवृत्त एस.टी. महामंडळाचे वाहक विजय कोळी हे मुंबई येथून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तिनही मुले शिक्षणासाठी उल्हासनगर येथे राहतात.

मोठा मुलगा विश्वजीत विजय कोळी (वय 21) हा स्थापत्य शास्त्राचे शिक्षण घेत होता. त्याचा भाऊ देवेश, लहान बहिण अस्विता, हे सर्व उल्हासनगर येथे राहत होते.

दरम्यान लॉकडाऊनमध्ये हे तिघेही आपल्या गावी भोलाणे येथे रहायला आले होते. सोमवारी भाऊबिजेच्या दिवशी विश्वजीत याने नैराश्यातून विष पिण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या हातातील बाटली हिसकावून त्याला रोखण्यात आले. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर दहा मिनीटांनी लहान बहिण अस्विता हिने घराच्या बाहेर जावून विष प्राषण केले.

कुटूंबियांच्या लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अस्विता हिच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर विश्वजीत याच्या विषप्राषण प्रकरणी चौकशी सुरु आहे. तपास तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या