Thursday, April 25, 2024
Homeनगरमानोरीत बहीण-भावाला कुर्‍हाडीच्या तुंब्याने मारहाण

मानोरीत बहीण-भावाला कुर्‍हाडीच्या तुंब्याने मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

भावाला मारहाण (Brother Beating) करीत असताना बहीण भांडणे सोडविण्यासाठी गेली. तेव्हा बहीण-भावाला लाथाबुक्क्यांनी व कुर्‍हाडीच्या (Axe) तुंब्याने मारहाण (Beating) केल्याची घटना दि. 28 ऑगस्ट रोजी राहुरी (Rahuri) तालुक्यातील मानोरी (Manori) येथे घडली आहे.

- Advertisement -

तेलकुडगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार; शेतकरी भयभीत

दि. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान मिनाज हकिम शेख, रा. मानोरी, ता. राहुरी ही तरूणी तिच्या घरासमोर उभा होती. तेव्हा या घटनेतील आरोपी हे मिनाज शेख हिचा भाऊ तय्यब शेख याला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करू लागले. भावाला मारत असल्याचे पाहून मिनाज शेख ही भांडण सोडविण्यासाठी गेली. तेव्हा आरोपींनी कुर्‍हाडीच्या तुंब्याने त्यांना मारहाण (Beating) करून जखमी (Injured) केले.

चास कामरगाव घाटात लष्कराची गाडी पलटली

घटनेनंतर मिनाज हकिम शेख हिने राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून आरोपी मेहबूब अब्बास शेख, शकिल अब्बास शेख, मदिना अब्बास शेख सर्व रा. मानोरी, ता. राहुरी या तिघांवर गुन्हा रजि. नं. 829/2022 भादंवि. कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पोपट कटारे हे करीत आहेत.

मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

- Advertisment -

ताज्या बातम्या