सिन्नर: ‘या’ तारखेला होणार भगवती देवी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

jalgaon-digital
3 Min Read

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

शहरातील गावाबाहेरील देवी मंदिरातील भगवती देवीच्या जुन्या जीर्ण झालेल्या मूर्तीच्या जागेवर नव्या मूर्तीची येत्या नवरात्र उत्सवात (navratrotsav) प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे (Senior leader Prakashbhau Waje) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पूर्वीची दुकणाची मूर्ती जीर्ण झाल्याने नवी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता व नाशिक (nashik) येथील मूर्तिकार मयूर मोटे (Sculptor Mayur Mote) यांना मूर्ती बनवण्याचे काम देण्यात आले होते. त्यांनी सात फूट उंच व साडे पाच फूट रुंदीची धातूची मूर्ती बनवली असून या मूर्तीचे वजन 500 किलो आहे. मूर्ती मोठी झाल्याने पूर्वीचा गाभाराही 16 बाय 12 फूट असा प्रशस्त झाला असून त्याची उंची ही वाढली आहे.

गाभार्‍याला अकरा बाय आठ फुटाचा सागवानी लाकडाचा नक्षीकाम केलेला दरवाजा बसवण्यात आला आहे. श्री भगवती देवी मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विवेक चांडक व माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मूर्तीचा खर्च उचलला आहे. मंदिराचा प्रशस्त गाभारा भाविकांना मंदिरातून परतण्यासाठी प्रशस्त पायर्‍या उभारणे, मंदिरासह संपूर्ण परिसराची रंगरंगोटी करणे व विद्युत कामे पूर्ण करण्यात आली असून लोकसहभागातून हा संपूर्ण खर्च करण्यात आला आहे.

नवरात्र उत्सवातील (Navratrotsav) पहिल्या माळेपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. सोमवारी (दि. 26) दुपारी 3 वाजता हॉटेल पंचवटीपासून नव्या मूर्तीच्या शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेत बँड पथक, संभळ, लेझीम पथक, महिलांचे भजनी मंडळ, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला सहभागी होणार आहेत. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून ही शोभायात्रा (procession) गावाबाहेरील देवी मंदिरात पोहोचेल. त्यानंतर मूर्तीस जल अधिवास घालण्यात येईल. दुसर्‍या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी (Pranapratistha ceremonie) आवश्यक त्या पूजेची मांडणी करण्यात येईल व मूर्तीला पुष्प आणि फळांच्या अधिवासात ठेवण्यात येईल.

दि. 30 सप्टेंबर रोजी मूर्तीला धान्याच्या अधिवासात ठेवण्यात येणार असून भाविकांनी दि. 29 सप्टेंबर पर्यंत आपल्या श्रद्धेनुसार मंदिरात गहू आणून देण्याचे आवाहनही प्रकाशभाऊंनी केले. दि. 28 पासून तीन दिवस प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आला असून त्यात पाच यज्ञ कुंड असणार आहेत. त्यात दररोज 21 जोडपी पूजेला बसणार असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाशभाऊ यांनी केले. हॉटेल पंचवटीत झालेल्या पत्रकार परिषदेस विवेक चांडक, राजाभाऊ देशपांडे, प्रमोद चोथवे, महेंद्र तारगे, किशोर अग्रवाल, रतन लोंढे, वासुदेव मूत्रक उपस्थित होते.

गणेश पेठेतील देशमुखांच्या कालिका माता मंदिराचा जिर्णोध्दार यापूर्वी करण्यात आला होता. त्यावेळी देशमुखांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये 1842 मध्ये गावाबाहेरील भगवती देवीच्या मंदिरासह कमळेश्वर मंदिर व श्री भैरवनाथ मंदिराला प्रत्येकी सव्वा रुपयांची दक्षिणा दिली असल्याची नोंद पाहायला मिळाली होती. त्यामुळे हे मंदिर त्यापूर्वीपासून असावे हे स्पष्ट होत असल्याचे प्रकाशभाऊ म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *