Tuesday, April 23, 2024
HomeनाशिकSinnar News : बंधाऱ्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Sinnar News : बंधाऱ्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर बंधाऱ्यात ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह (Deadbody) आढळून आला आहे. ५ मे पासून घरातून बाहेर पडलेल्या या युवकाचा मृतदेह बंधाऱ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

दुशिंगपूर येथे मोठा साठवण तलाव आहे. या तलावाच्या कडेला युवकाचे कपडे आणि मोबाईल मिळून आल्याने पोलिसांनी (Police) त्याचा तलावात शोध घेतला. बंधाऱ्यातील पाण्यात त्याचा मृतदेह गुरुवारी आढळून आला.

संतोष उर्फ माधव अशोक पवार (Madhav Ashok Pawar) (३२ रा. सांगवी ता. सिन्नर) हा तरुण वावीचे माजी सरपंच कन्हैयालाल भुतडा यांच्या शेतात सहकुटुंब वास्तव्याला आहे. तो भुतडा यांच्याकडे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. गेल्या ५ तारखेपासून त्याने सुट्टी घेतली होती.

नाशिकहून ‘या’ तीन शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु

तेव्हापासून तो कामावर नव्हता बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बंधाऱ्याच्या कडेला पवार याचे कपडे, मोबाईल व चपला आढळून आल्या. घटनेची माहिती वावी पोलिसांना दिल्यानंतर स्थानिक तरुणांनी व नातेवाईकांनी बंधाऱ्याच्या पाण्यात उतरून माधवचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवण्यात आले.

जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

बुधवारी रात्री अंधार पडल्यानंतर शोध कार्य थांबवण्यात आले. गुरुवारी सकाळी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे, हवालदार नितीन जगताप, पंकज मोरे, सोपान शिंदे, शैलेश शेलार, पंकज मोंढे यांच्यासह वावी पोलिस पथकाने पुन्हा स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा?

सायखेडा येथील जीव रक्षक दलाच्या तुकडी सकाळपासून बंधाऱ्यात शोध घेत होती. सिन्नर तालुक्यातील बेलू येथील सराईत पोहणारे तुपे देखील मदत कार्यात सहभागी झाले. दुपारी एकच्या सुमारास मृतदेह आढळून आला. मयत माधव पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या