सिन्नर तालुकाऔद्योगिक सहकरी वसाहत निवडणूक; मतदान प्रक्रिया पूर्ण इथे पाहा निकाल

jalgaon-digital
1 Min Read

सिन्नर | विलास पाटील

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीसाठी (Sinnar taluka midc) आज (दि १७) रोजी झालेल्या मतदानात (Voting) निर्धारित चार वाजेपर्यंत 339 पैकी 306 (90.26 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 36 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले….

सकाळी आठ वाजेपासूनच संस्थेच्या कार्यालयात मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. तीनही पॅनलचे बूथ सिन्नर बाजूच्या शिर्डी रस्त्यावर लावण्यात आले होते. संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ तीनही पॅनलच्या उमेदवारांनी गर्दी केलेली होती.

प्रवेशद्वारावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे मतदान कार्ड असलेल्या मतदारांनाच प्रवेशद्वारातून आत प्रवेश दिला जात होता.

दुपारी साडेचार वाजेनंतर मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होणार असून सायंकाळी सहा ते 6.30 पर्यंत निवडणूक निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *