Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर: नगरपरिषदेकडून स्वातंत्र्य सैनिक वारसांचा सत्कार

सिन्नर: नगरपरिषदेकडून स्वातंत्र्य सैनिक वारसांचा सत्कार

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सानिमित्त नगरपरिषदेकडून (Nagar Parishad) तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारासांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेच्या सभागृहात तहसीलदार राहुल कोताडे (Tehsildar Rahul Kotade) व मुख्याधिकारी संजय केदार यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

यावेळी तालुक्यातील कृष्णाजी विठोबा लोणारे, शंकरलाल रतनलाल कपूर, केशवचंद गोपालदासजी जाजू, बाबुराव रामजी काकड, दामोधर सावळीराम काकड, भारतसिंग नारायण सिंग गहेरवार, अण्णासाहेब पांडुरंग शिंदे, गणपत लक्ष्मण धोकटे, नारायण खंडू गोळेसर, बारक दगडू मरकड, बाळाजी गंगाराम गुंड, रामचंद्र भाऊ काकड, हरी गोविंद पाटील, बाबुराव बळवंत जगदाळे, मनोहर मोहिनीराज तांबट या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला.

सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे, तलाठी हांडे यांचे हस्ते शाल-श्रीफळ, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात साजरा होत आहे. हा दिवस भारतीयांना अनुभवता यावा यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळेच आपल्याला स्वातंत्र्याची पहाट पाहता आली हे आपल्याला विसरुन चालणार नाही. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे योगदान महत्वाचे होते. म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सनिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा होत असलेला सन्मान हा त्यांच्या प्रती कृतज्ञता असल्याचे मत वायाचळे यांनी व्यक्त केले.

यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे वारस सुभाष जाजू, सुरज शिंदे, मनोज कपूर, गणेश कपूर यांनी मनोगत व्यक्त केले. नायब तहसीलदार मुंदडा यांनी आभार मानले. यावेळी उपमुख्याधिकारी रोहित पगार, आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, सौरभ गायकवाड, मयुरी नवले, सिद्धेश मुळे, अर्जुन भोळे, दिलीप गोजरे, राजेंद्र आंबेकर, दीपक भटजीरे, विजय वाजे, निवृत्ती चव्हाण, गीतांजली मराडे, ज्योती सोणवणे, कैलास शिंगोटे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या