Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनप्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

दिल्ली | Delhi

भजन सम्राट लोकप्रिय गायक नरेंद्र चंचच यांचं आज निधन झालय. नरेंद्र चंचल यांनी ८०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

गायक दलेर मेहेंदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. ‘गायक नरेंद्र चंचल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला दु:ख झाले’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

नरेंद्र चंचल यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४० मध्ये अमृतसरमधील एका धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला. कुटुंबातील धार्मिक वातावरणात ते मोठे झाले आणि त्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच भजन-किर्तनाची आवड होती. नरेंद्र चंचल यांना अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याचे मानद नागरिकत्वही मिळाले होते.

नरेंद्र चंचल यांनी गेल्या अनेक दशकांपासून भजन-कीर्तनात सक्रिय होते. बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर नरेंद्र चंचल यांनी १९७३ मध्ये अभिनेता ऋषी कपूर-डिंपल कपाडिया यांच्या बॉबी सिनेमासाठी गाणे गायले होते. बेशक मंदिर मस्जिद हे गाणे त्यांनी गायले. यासाठी नरेंद्र चंचल यांना फिल्मफेअर बेस्ट मेल प्लेबॅक पुरस्कार सुद्धा मिळाला होता. नरेंद्र चंचल यांना ‘आशा’ सिनेमात गायलेले भजन ‘चलो बुलावा आया है’ या गाण्याच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले. बॉबी सिनेमानंतर नरेंद्र चंचल यांनी १९७४ मध्ये बेनाम आणि रोटी कपडा और मकान या सिनेमांसाठी गाणी गायली. लता मंगेशकर यांच्यासोबत नरेंद्र चंचल यांनी गाणी गायली आहेत. तसेच मोहम्मद रफी यांच्यासोबत १९८० मध्ये ‘तूने मुझे बुलाया शेरा वालिए’ हे गाणं गायले. तर १९८३ मध्ये आशा भोसले यांच्यासोबत चलो बुलावा आया है माता ने बुलाया है हे गाणे गायले.

- Advertisment -

ताज्या बातम्या