Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदिंडोरी तालुक्यातील अर्धा भाग अजूनही अंधारातच

दिंडोरी तालुक्यातील अर्धा भाग अजूनही अंधारातच

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक खेडेगावामध्ये महावितरण कंपनी कडून सिंगल फेंज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र शिवारात (मळयात) राहणा-या जनतेला मात्र रात्रीच्या वेळेस अंधाराचा सामना करावा लागत आहे. जेव्हापासून महाराष्ट्रात लोडशेडिंग अस्तित्वात आली, तेव्हा पासून तर आजपर्यत महावितरण कंपनीने मळ्याच्या वस्त्यावर राहणा-यां जनतेसाठी कोणतेही टोस पाऊल उचललेले नाही.

- Advertisement -

यामुळे वाड्या वस्त्यावर मळ्यामध्ये राहणा-या जनते मध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. सिंगल फेज योजनेसाठी ज्या ठिकाणी वीज उपकेंद्र आहे. त्याच ठिकाणी प्रत्येक परिसरासाठी गावासाठी गावठाण फिडर व मळ्यासाठी कृषी फिडर अशी विभागणी करून कृषी फिडरवर सिंगल फेंजचा ट्रासफार्मर बसवून सिंगल फेजची वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.

रात्रीच्या वेळेत थ्री फेज वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सिंगल फेज वीजपुरवठा चालू होतो. तालुक्यात बोटावर मोजण्या इतक्या ठिकाणी सिंगल फेंज योजना कार्यान्वित करण्यात आल्या असून सुरळीत पणे चालू आहे.

यामुळे तालुक्यातील मळ्याच्या वस्तीवर राहणारी काही जनता प्रकाशात तर काही जनता अंधारात आशे काहीसे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात ज्या वीज उपकेंद्रामध्ये सिंगल फेंज योजना चालू झालेली नाही. किंवा फिडरची गावठाण फिडर व कृषी फिडर अशी विभागणी केलेली आहेत.

अशा ठिकाणी मळ्यामध्ये राहणारे लोक ट्रासफार्मरच्या वर डिओ टाकून ट्रासफार्मर मध्ये वीज तयार करून मळ्यासाठी वीज पुरवठा केला जातो. यामुळे घरात कमी दाबाची का होईना लाईट येते. मात्र हा विज पुरवठा अधिकृत नसून यामुळे अपघात होण्याची जास्त शक्यता असते. तसे अपघातही झालेले आहेत. त्यामुळे सिंगल फेजचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

गेल्या कित्येक वर्षापासून शिवारात मळ्यात राहणाऱ्या लोकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. आम्हाला महावितरण कंपनीकडून न्याय कधी मिळणार? महावितरण कंपनीने आमची विजेची त्वरित सोय करावी.

विलास जाधव शेतकरी करंजवण

- Advertisment -

ताज्या बातम्या