Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रSindhudurg District Bank Election Results : सिंधुदुर्गात जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचं वर्चस्व,...

Sindhudurg District Bank Election Results : सिंधुदुर्गात जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचं वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का

सिंधुदुर्ग | Sindhudurg

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg district bank election) मतमोजणीला झाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपनं बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली असून ११ जागा जिंकत भाजपनं सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळवता आला आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; अज्ञातवासातील नितेश राणेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

विजयी उमेदवारांची यादी

१) शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका

सतीश सावंत (महावि. आघा.)-पराभूत

विठ्ठल देसाई (भाजप)- विजयी

२) शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका

प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत

विद्याप्रसाद बांदेकर (महावि. आघा.)- विजयी

सुभाष मडव (अपक्ष)- पराभूत

३) शेती संस्था मतदारसंघ सावंतवाडी तालुका

गुरुनाथ पेडणेकर (भाजप)- पराभूत

विद्याधर परब (महावि. आघा.)- विजयी

४) शेती संस्था मतदारसंघ मालवण तालुका

व्हिक्टर डान्टस (महावि. आघा.)- विजयी

कमलाकांत कुबल (भाजप)- पराभूत

५) शेती संस्था मतदारसंघ वेंगुर्ला तालुका

मनीष दळवी (भाजप)- विजयी

विलास गावडे (महावि. आघा.)-पराभूत

६) शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका

प्रकाश बोडस (भाजप)- विजयी

अविनाश माणगावकर (महावि. आघा.)-

७) शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका

प्रकाश गवस (भाजप)- पराभूत

गणपत देसाई (महावि. आघा.)- विजयी

८) शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी तालुका

दिलीप रावराणे (भाजप)- विजयी

दिगंबर पाटील (महावि. आघा.)- पराभूत

९) नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ

राजन तेली (भाजप)- पराभूत

सुशांत नाईक (महावि. आघा.)- विजयी

१०) दोन महिला प्रतिनिधी

प्रज्ञा ढवण (भाजप)- विजयी

अनोरोजीन लोबो (महावि. आघा.) पराभूत

११) दोन महिला प्रतिनिधी

अस्मिता बांदेकर (भाजप)- पराभूत

नीता राणे (महावि. आघा.)- विजयी

१२) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

आत्माराम ओटवणेकर (महावि.आघा.)- विजयी

सुरेश चौकेकर (भाजप)- पराभूत

१३) इतर मागास मतदारसंघात

रवींद्र मडगावकर (भाजप)- विजयी

मनिष पारकर (महावि. आघा.)- पराभूत

१४) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ

गुलाबराव चव्हाण (भाजप)- पराभूत

मेघनाथ धुरी (महाविकास आघाडी)- विजयी

१५) सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ

अतुल काळसेकर (भाजप)- विजयी

सुरेश दळवी (महावि. आघा.)- पराभूत

१६) औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघ

गजानन गावडे (भाजप)- विजयी

लक्ष्मण आंगणे (महावि. आघा.)-

१७) मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ

महेश सारंग (भाजप)- विजयी

मधुसूदन गावडे (महावि. आघा.)- पराभूत

१८) विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था

विनोद मर्गज (महावि. आघा.)-

संदीप परब (भाजप)- विजयी

१९) कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ

विकास सावंत (महावि. आघा.)- पराभूत

समीर सावंत (भाजप)-विजयी

गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. यावेळी एकूण ९८१ पैकी तब्बल ९६८ मतदारांनी म्हणजे ९८.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ११५ महिला व ८५३पुरुषांचा समावेश होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या