Friday, April 26, 2024
Homeनगरसीना नदीवरील पूल बनला धोकादायक

सीना नदीवरील पूल बनला धोकादायक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सीना नदीवरील सावेडी, बोल्हेगाव जवळील पूल धोकादायक झाला आहे. यावर्षी मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे सीना नदीला अनेकवेळा पूर आला.

- Advertisement -

अनेक वर्षांचा असलेला पूल खराब झाला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी शेतकरी, एमआयडीसीतील कामगार व बोल्हेगाव ग्रामस्थांची सतत वाहतूक सुरू असते. कोणतीही अनुसूचित घटना घडू नये, यासाठी या पुलाचे काम लवकरात लवकर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

सीना नदीवरील बोल्हेगाव परिसरातील पुलाचे काम अनेक वर्षांपूर्वी झाले आहे. या पुलावरून या परिसरातून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. रात्री-अपरात्री सीना नदीला पावसाचा पूर आलेला कळत नाही. तसेच या पुलावर खड्डे पडलेले आहेत.

पुलास कठडे नसल्यामुळे एखादा अनुसूचित प्रकार घडू नये. यासाठी या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी व या नदीवर नवीन पूल करण्यात यावा, म्हणून आ. संग्राम जगताप यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. ते लवकरच या पुलाचा प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या