Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारश्रद्धा वालकर हत्याकांडाच्या पार्श्‍वभुमीवर नवापूरात मूक मोर्चा

श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या पार्श्‍वभुमीवर नवापूरात मूक मोर्चा

नवापूर | श. प्र. Navapur

दिल्ली (Delhi) येथे अत्यंत क्रूरपणे घडलेल्या श्रध्दा वालकर (Shraddha Walker) हत्याकांड प्रकरणाच्या निषेधार्थ आज सकाळी १० वाजता शहरातील गणपती मंदीरापासून समस्त हिंदु समाजातर्फे मूकमोर्चा (silent front) काढण्यात आला.

- Advertisement -

मूकमोर्चा श्री गणपती मंदिरापासून सुरुवात करत मोर्चा सरदार चौक, शिवाजी रोड, कुंभारवाडा, महात्मा गांधी पुतळा, लिमडावाडी, लाईटबाजार या मार्गाने फिरुन तहसिल कार्यालयाच्या आवारात सांगता करण्यात आली. तहसिलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, राजधानी दिल्ली येथे अत्यंत क्रूरपणे घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा नवापूर सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेधनोंदवण्यात आला. श्रद्धाला ज्याप्रकारे क्रूरपणे ठार मारण्यात आले.

त्याने संपूर्ण समाजात प्रचंड रोष आहे. महिला व पालक चिंतीत व भयभीत आहेत. सदर घटना फक्त अपराध नसून लव्ह जिहादचे षडयंत्र आहे. दिवसेंदिवस अश्या या घटना संपूर्ण देशात व आपल्या तालुक्यात, नवापूर शहरात व परिसरात पण वाढत आहे.

मुळात लव्ह जिहादचे बरेच प्रकार आपल्या तालुक्यात सुद्धा घडले आहेत. महिला भगिनींना प्रेमजाळात फसवून बळजबरी धर्मांतर करण्याचे षडयंत्र काही असामाजिक तत्व करतात. त्यांना मदत करणारी टोळी सक्रिय असते.

आपल्या तालुक्यातही अश्या घटना घडवून आणणार्‍या असामाजिकतत्वांवर लक्ष केंद्रित झाले पाहिजे, महिला भगिनींच्या छेडछाड आणि रोड रोमियोंबद्दल झालेल्या तक्रारीबाबत प्रशासनाने योग्य वेळी अत्यंत तातडीने गांभीर्याने कार्यवाही केली पाहिजे.

शाळा, कॉलेज आणि तत्सम परिसरात करडी नजर ठेवली पाहिजे.जेणेकरून अश्या घटनांना आळा बसेल, लव्ह जिहाद या विषयावर त्वरित कायदा करून हिंदू तरुणींवर होणारा छळ कुठे तरी थांबला पाहिजे. लव्ह जिहाद या समस्येवर शासनाने कडक कायदा बनविला पाहिजे. हत्याकांड घडवणार्‍या अपराध्यास अत्यंत कडक शिक्षामिळावी अशी मागणी करण्यात आली.

निवेदनावर राजेंद्र गावीत, दर्शन पाटील, जितेंद्र अहिरे, किरण टिभे, नगराध्यक्षा सौ हेमलता पाटील, नगरसेवक महेंद्र दुसाने, विशाल सांगळे, हसमुख पाटील, अनिल वारुडे, राहुल मराठे, संदिप पाटील, घनश्याम परमार, निलेश प्रजापत, माजी नगरसेविका सुनिता वसावे, जिग्नेशा राणा, हेमंत शर्मा, शंभू सोनार, अजय अग्रवाल आदींच्या सह्या आहेत.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक अशोक मोकळ, मनोज पाटील, असइ विकास पाटील, निजाम पाडवी, विनोद पराडके, कैलास तावडे, रणजीत महाले सह पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या