Friday, April 26, 2024
Homeनगरसायलनसरमध्ये छेडछाड केलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई

सायलनसरमध्ये छेडछाड केलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीच्या सायलनसरमध्ये छेडछाड करून वेगात दुचाकी पळविणार्‍यांवर नगर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी बुधवारी सकाळपासून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून अशा दुचाकीची तपासणी करून त्या ताब्यात घेतल्या. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे निरीक्षक वाघ यांनी सांगितले.

- Advertisement -

दुचाकीच्या मूळ सायलनसरमध्ये छेडछाड करून मोठ्या आवाजाचे सायलनसर दुचाकीला बसविले जाते. रस्त्यावरून जाताना अशा दुचाकीच्या सायलनसरचा मोठा आवाज केला जातो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होता. आता या दुचाकीवर कारवाई करण्यास नगर शहर वाहतूक शाखेने सुरूवात केली आहे.

निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बुधवारी नगर शहरातील ठिकठिकाणी मोठ्या आवाजाचे सायलनसर असलेल्या दुचाकी ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही अशा दुचाकींवर कारवाई केली जाणार आहे, असे निरीक्षक वाघ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या