Saturday, April 27, 2024
Homeनगरसिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी सदगीरला दाखवले आसमान

सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी सदगीरला दाखवले आसमान

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील कोरेगाव येथे अजित शेळके मित्र मंडळ यांच्यावतीने भव्य निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर याला चितपट करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

- Advertisement -

कोरेगाव येथे राज्यातील नामांकित पैलवानांचे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन माजी मंत्री आ. राम शिंदे व कुस्ती महर्षी पंढरीनाथ पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिग्विजय बागल अतुल पाटील प्रवीण घुले, अशोक खेडकर, काका शेळके, काका धांडे, अनिल खराडे, महेश तनपुरे, डॉक्टर सुरेश भिसे, सोमनाथ पाचारणे, राहुल सरकाळे, अतुल घोडगे, विजय मोढळे, बप्पासाहेब धांडे, प्रकाश शिंदे, यांच्यासह आलेख मान्यवर व राज्यातील कुस्ती शौकीन तसेच कुस्ती मार्गदर्शक उपस्थित होते.

अजित शेळके मित्र मंडळाच्या वतीने पहिली तिरुपती केसरी स्पर्धा कोरेगाव येथे घेण्यात आली. महाराष्ट्र केसरीचे मैदान गाजवणारा सिकंदर शेख व हर्षद साठी यांच्यामध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार असल्यामुळे ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.या स्पर्धेमध्ये तानाजी झुंजुर्के विरुद्ध महारुद्र काळे, शुभम शिदनाळे विरुद्ध अनिल जाधव, आशिष वावरे विरुद्ध राम कांबळे, विजय पवार, श्रीनिवास पाथरूड, निखिल कदम, देवानंद पवार, दादा मुरकुटे, शुभम रणशूर, ऋषिकेश शेळके, अक्षय चव्हाण, तुषार जगताप, सागर शिंदे यांच्यासह स्थानिक पैलवानांनी मैदान गाजवले.

कोरेगाव परिसरातील व कर्जत तालुक्यातील आणि पैलवानांनी प्रतिस्पर्धी मल्लांना आसमान दाखवले. या स्पर्धेचे आयोजन पैलवान अजित शेळके, बापूसाहेब शेळके, निळकंठ शेळके, किरण नलावडे, अजय नेटके, गणेश शेळके, पांडुरंग शेळके सोमनाथ शेळके, भाऊसाहेब शेळके, विनोद मुरकुटे, हरी मुरकुटे, कांतीलाल वाघ, अजय थोरात यांनी केले होते या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद कुस्ती प्रेक्षकांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या