Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिककरांना दिवाळी महाग पडणार..!

नाशिककरांना दिवाळी महाग पडणार..!

नाशिक । Nashik

केंद्र शासनाकडुन नोव्हेंबर महिन्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यानंतर याचे परिणाम दिल्लीत दिसु लागले आहे.

- Advertisement -

राज्यात थंडी वाढु लागली असतांनाच दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने सामाजिक अंतराचा फज्जा उडत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मात्र करोनाचा प्रभाव कमी होतांना दिसत असतांना संशयितांचा आकडा वाढु लागला आहे. यामुळे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने व मास्कचा वापर होत नसल्याने दिवाळीनंतर करोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आता जाणकरांकडुन व्यक्त केली जात आहे.

नाशिक शहरात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात करोना रुग्णांची संख्या दुप्पटीवर गेली होती. यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या प्रतिदिन रुग्णांची 1 हजारावर जाऊन पोहचली होती. पुढे करोना रुग्णांत लक्षणिय घट होऊन आक्टोंबर महिन्यात प्रतिदिन नवीन रुग्णांचा आकडा 300 ते 350 च्या आत आला होता. आता नोव्हेंबर महिन्यात नवीन रुग्णांचा आकडा 200 ते 100 दरम्यान आला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या 13 दिवसात 1 हजार 774 नवीन करोना रुग्ण समोर आले आहे.

यापुर्वी 21 ते 31 आक्टोंबर या दहा दिवसात 6 हजार 86 इतके रुग्ण समोर आले होते. यावरुन करोनाचा प्रभाव कमी झाला आहे. जुन महिन्यात असलेली स्थिती गुरुवारी (दि.12) दिसुन आली असुन यादिवशी सर्वात कमी असे 87 करोना रुग्ण समोर आले आहे. असे असले तरी संशयित रुग्णांत मोठी वाढ होत असुन यातूनच नवीन रुग्णांची भर पडत आहे.

गेल्या तीन चार दिवसात पारा 2 ते 3 अंशाने पारा खाली घसरला असल्याने हवामानात बदल झाल्याने करोना संसर्गाचा धोका वाढला आहे. यामुळेच आता दिवाळीनंतर करोना संसर्ग वाढण्याची भिती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या