जातीय सलोख्यासाठी स्वाक्षरी मोहिम यशस्वी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

जातीय सलोखा (Ethnic reconciliation) राखण्यासाठी चाळीसगाव पोलिस स्टेशनतर्फे आयोजित स्वाक्षरी मोहीम (Signature campaign) मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या मोहिमेत मान्यवरांसह तब्बल साडेतीन हजार नागरिकांनी सहभाग नोदवत स्वाक्षरी केली.

पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे (Superintendent of Police Dr. Pravin Mundhe) यांच्या संकल्पनेतून चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथ दि,०७ रोजी सकाळी १० ते रात्री ०८ वाजेपर्यंत जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उदघाटन अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या हस्ते व प्रातांधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पो. अधिकारी कैलास गावडे, तहसीलदार अमोल मोरे, न.पा.चे मुख्याधिखारी ठोंबरे साहेब, गटविकास आधिकारी नंदकुमार वाळेकर आदिच्या प्रमुख उपस्थित झाले.

या मोहिमेत शहरातील व तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटना , धार्मिक संस्थेचे पुजारी, ट्रस्टी, मौलाना, रोटरी क्लब, जॉगिंग ग्रुप, सायकलिंग ग्रुप, शैक्षणिक संस्था, शिक्षक वर्ग, शालेय विद्यार्थी , धार्मिक संघटना , शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील, वैद्यकीय संघटना, मेडीकल असोसिएशन, शासकीय कार्यालय, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, पत्रकार बंधू, महिला संघटना व सर्व जाती धर्माचे नागरिक , महिला व मुले, सराफा व्यापारी असोसिएशन, रेडिमेड व कपडा असोसिएशन, प्रिंटींग असोसिएशन सर्व व्यापारी सदस्य व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सामाजिक, सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रातील लोकांनी सहभाग नोंदवला. तसेच सर्व सामान्य लोकांनीह जातीय सलोख्याची स्वाक्षरी केली. दिवसभरातून तब्बल ताडेतीन हजार लोकांनी स्वाक्षरी करत ही मोहिम यशस्वी केली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *