Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिग्नल बंद असल्याने वाहन चालकांची तारांबळ

सिग्नल बंद असल्याने वाहन चालकांची तारांबळ

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

सिटी सेंटर येथील सिंग्नल गेल्या तीन दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने वाहन चालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत असून वाहन चालवतांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

- Advertisement -

नवीन नाशिक परिसरातून शहरात जाण्याकरिता तसेच कॉलेज रोड ,गंगापूर रोड,मुंबई आग्रा महामार्गावर जाण्याकरिता संभाजी चौक येथील सिंग्नल येथून जावे लागत असल्याने याठिकाणी दिवस रात्र वाहतुकीची वर्दळ सुरु असते. येथील वाहतूक लक्षात घेता याठिकाणी सिंग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

मात्र गेल्या सुमारे तिन दिवसांपासून येथील सिंग्नल यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत असल्याने वाहन चालकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या ठिकाणी बऱ्याचदा वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने लवकरात लवकर येथील सिंग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या