Friday, April 26, 2024
Homeक्रीडाशुभमन गिलनं किवीला धुतलं; द्विशतक झळकावणारा जगातील सर्वात युवा फलंदाज

शुभमन गिलनं किवीला धुतलं; द्विशतक झळकावणारा जगातील सर्वात युवा फलंदाज

मुंबई | Mumbai

भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये (India vs New Zealand) पहिल्या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलने (Shubman Gill) विक्रमी द्विशतक झळकावले आहे.

- Advertisement -

गिलने १४९ चेंडूत २०८ धावा ठोकल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा दहावा फलंदाज ठरला आहे. शुबमन गिलने १४९ चेंडूचा सामना करताना आपल्या खेळीत १९ चौकार आणि ९ षटकार लगावले आहेत. तो भारताकडून वनडेत द्विशतक झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. द्विशतक झळकावणारा तो जगातील सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.

आतापर्यंत ‘या’ भारतीय खेळाडूंनी केले द्विशतक

सचिन तेंडुलकर २००* वि. दक्षिण आफ्रिका २०१०

वीरेंद्र सेहवाग २१९ वि. वेस्ट इंडीज २०११

रोहित शर्मा २०९ वि. ऑस्ट्रेलिया २०१३

रोहित शर्मा २६४ वि. श्रीलंका २०१४

रोहित शर्मा २०८* वि. श्रीलंका २०१७

इशान किशन २१० वि. बांगलादेश २०२२

शुभमन गिल २०८ वि. न्यूझीलंड २०२३

- Advertisment -

ताज्या बातम्या