Sunday, May 5, 2024
Homeनाशिकअभिनय संगीत मध्ये सृष्टी देव महाराष्ट्रात चौथी

अभिनय संगीत मध्ये सृष्टी देव महाराष्ट्रात चौथी

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

कु. सृष्टी देव ही ”प्रशांत दामले फॅन फाउंडेशन थिएटर आर्ट्स पुरस्कृत पुणे” अभिनय, संगीत, वक्तृत्व, न्रृत्य स्पर्धेत महाराष्ट्रात चौथी आली. याबद्दल नवीन नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

- Advertisement -

सृष्टीला मराठी सिने अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देवुन गौरविण्यात आले.

१४ प्रतिस्पर्धी स्पर्धकांमध्ये तिला चौथा क्रमांक देवुन गौरविण्यात आले. महत्वाचे म्हणजे पूर्ण स्पर्धेत नाशिक कडून फक्त कु. सृष्टी ही एकमेव स्पर्धक होती. या स्पर्धेतील दोन स्पर्धक पुणे व एक मुंबईतील होत्या.

कु. सृष्टी हीचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. मनसे तर्फे कैलास मोरे, अर्जुन वेताळ, नितीन माळी, भालचंद्र देसले यांचे कडून सत्कार करण्यात आला.

पुढील वाटचालीसाठी मनसेच्या वतीने वेळोवेळी मदत केली जाईल असे मनकासे उपचिटणीस कैलास मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या