श्रीश्रेत्र सराला बेट ते श्रीश्रेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे 24 जूनला प्रस्थान

jalgaon-digital
2 Min Read

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या योगिराज सदगुरु श्री गंगागिरी महाराज यांच्या कृपेने व ब्रम्हलिन श्री नारायणगिरी महाराज यांच्या अशिर्वादाने महंत रामगिरी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने श्रीश्रेत्र सराला बेट ते श्रीश्रेत्र पंढरपूर पायी दिंडी शुक्रवार दि. 24 जून रोजी प्रस्थान करणार आहे.

योगिराज सदगुरु गंगागिरी महाराज यांनी या दिंडीची सुरुवात केली होती. ही परंपरा ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज यांनी कायम ठेवली होती. महंत रामगिरी महाराज यांनी दिंडीची व्याप्ती व महती वाढविली आहे. 24 जून रोजी योगिराज गंगागिरी महाराज यांच्या चरण पादुका व प्रतिमेची रथात स्थापना करुन बेटाची प्रदक्षिणा करुन उंदिरगाव मार्गे पंढरपुर कडे मजल दरमजल करत दिंडी प्रस्थान करणार आहे. दिंडीचे प्रस्थान करण्याच्या आदल्या दिवशी दि. 23 रोजी बेटात मुक्कामी येणार्‍या भाविकांसाठी चैतन्य कानिफनाथ देवस्थान चांदेगाव (राहुरी) यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

एकादशीच्या दिवशी 24 जून रोजी दिंडी बेटावरुन प्रस्थान केल्यानंतर माळेवाडी (ता. श्रीरामपूर) येथे दुपारचे जेवण घेवून उंदिरगाव येथे पहिला मुक्काम करणार आहे. दि. 25 रोजी श्रीरामपूरच्या उत्सव मंगलकार्यालयात मुक्काम करेल. त्यानंतर ठिकठिकाणी मुक्काम करून दि.7 जुलै रोजी दिंडी पंढरपूर मठात मुक्काम करेल, तेथे 7 ते 10 जुलै पर्यंत मुक्काम असेल. पंढरपूर मठात दि. 11 जुलै रोजी महंत रामगिरी महाराज यांचे किर्तन होईल.

दि. 12 जुलैला महंत रामगिरी महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या किर्तनाने दिंडीची सांगता होईल. वैजापूर तालुक्यातील विरगाव मुर्शदपूर येथील ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होईल.

श्री श्रेत्र सराला बेट ते श्री श्री क्षेत्र पंढरपूर ही पायी दिंडीत 1 हजार भाविकांनाच सहभागी करुन घेतले जाईल. सहभागी होणारांनी आपली नाव नोंदणी आगोदरच बेटावरच करुन घ्यावी. दिंडी निघाल्यानंतर कुणाचीही नावनोंदणी करुन घेतली जाणार नाही. या दिंडीत सहभागी होणारांचा गणवेश हा पांढरा शुभ्र असावा. दिंडीचा हा नियम आहे. दिंडीच्या नियमाचे पालन केले पाहिजे. शिस्त पाळावी. दिंडीत मध्यंतरी सहभागी होतात, पावसाचे दिवस असल्यामुळे नियोजन चुकते. दोन चार दिवस उशीरा दिंडीत सहभागी झाले तरी चालेल परंतु अगोदर नोंदणी बेटातच होईल. नोंद नसेल तर दिंडीत सहभागी होता येणार नाही. भाविकांनी आगोदरच बेटावर येवुन नोंदणी करुन घ्यावी.

– महंत रामगिरी महाराज

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *