Videos # श्रींची पालखी पंढरपुरात दाखल

दिपक सुरोसे

शेगाव Shegaon :

राज्यासह देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या (Saint Shrestha Gajanan Maharaj) पालखीचे (Palkhi) आज मंगळवेढा येथील दुपारच्या विसाव्यानंतर सायंकाळी पंढरपुरात दाखल (arrives at Pandharpur) झाली.

आषाढी एकादशी उत्सवात त सहभागी होण्यासाठी तब्बल 33 दिवसापासून नऊ जिल्ह्यातून सातशे पन्नास किलोमीटर पायी प्रवास करत वारकरी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी तसेच आषाढी एकादशी उत्सवासाठी पंढरीत दाखल होते. श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथून दरवर्षी टाळ मृदंगाच्या गजरात श्रींची पालखी पंढरपूर येथे आषाढी एकादशी उत्सवासाठी जात असते पालखीचे यंदा 53 वे वर्ष आहे. यावर्षी पालखीमध्ये सातशे वारकरी सहभागी झाले आहेत.

राम कृष्ण हरी, गण गण गणात बोते असा नाम घोष आणि टाळ मुद्रांगाच्या गजरात मजल दरमजल करत ही पालखी संतनगरी कडून पंढरीकडे निघाली. आज पालखी आपल्या महत्त्वाच्या टप्प्यावर अर्थात पंढरपूरला सायंकाळी पोहचली. तत्पूर्वी प्रसिद्ध अशा मंगलवेढा येथे पालखीचा मुक्काम होता. श्री संत गजानन महाराज संस्थान सेवा शिस्त आणि स्वच्छता यात्री सूत्रीसाठी जगात प्रसिद्ध असून पालखीत सुद्धा ही शिस्तबद्धता पाहायला मिळते.

शिस्तबद्ध पालखी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील गजानन महाराजाचा पालखी सोहळा गण गण गणात बोते ‘व टाळ मृदंगाच्या गजरात प्रमुख मार्गावरून मंगळवेढ्यात विसावली. शेगाव येथील मंदिरातून 6 जूनला निघालेल्या या दिंडीचा प्रवास 33 दिवसात 9 जिल्ह्यातून 750 किमी चालत प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पोहचलीे.

श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा ५३ वे वर्ष असून अखंडितपणे पायी वारीची परंपरा असून कोरोना प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षांत पायी वारीमध्ये खंड पडला होता. दोन वर्षानंतर पालखी सोहळा शहरात आल्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली.

श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सोबत भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेतवस्त्रधारी 700 वारकरी ,वाहन,घोडे , बँड पथक आदी वाद्यसह शिस्तबद्ध रांगा अशी तीर्थक्षेत्र शेगाव ते पंढरपूर दरम्यान पायी चालत प्रवास करीत पालखीचे ठीक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे