Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीरामपूरच्या तरुणांनी अमरनाथ ढगफुटीतील महिला व मुलांना वाचविले

श्रीरामपूरच्या तरुणांनी अमरनाथ ढगफुटीतील महिला व मुलांना वाचविले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटी व दरड कोसळून त्याखाली दबलेल्या महिला व मुलांना श्रीरामपुरातील अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या तरुणांनी वाचविले. त्यांनी केलेल्या मदत कार्याबद्दल शहरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

शहरातील वार्ड नंबर 6 मधील स्मशानभूमी रोडवरील कालभैरवनाथ मित्र मंडळ व जय भोले मित्र मंडळ या दोन्ही मंडळाचे सदस्य जम्मु-काश्मीर मधील अमरनाथ यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेले आहेत. यात देवा चावरिया, विशाल आडांगळे, शंकर जाधव, व्यंकटेश आडांगळे, विकास जगधने, यश जगधने, मनोज भालेराव, साहिल झिंगारे व करण अडांगळे या तरुणांचा समावेश आहे. या तरुणांनी दि. 8 जुलै रोजी सायंकाळी पवित्र अमरनाथ देवदर्शन केले.

दर्शन करुन तेथून खाली उतरत असताना 5.30 वा. ढगफुटीमुळे त्यांच्यासमोर अचानक एक मोठी दरड कोसळली. ही घटना या तरुणांनी 50 फुट अंतरावरून पहिली. यावेळी दरडीखाली महिला व मुले अडकली. दरडीखाली अडकलेल्या भाविकांचा जीव वाचविण्यासाठी चालू असलेल्या ऑपरेशनमध्ये या तरुणांनी सहभाग घेत पाच महिला व दोन-तीन मुलांना सुखरुप बाहेर काढले.

स्थानिक प्रशासन व लष्करी दलाच्यावतीने या ठिकाणी जोरदार मदतकार्य चालू असून या घटनेत 16 भाविकांचा मृत्यू झाला असून 45 जण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने जाहीर केली आहे. या तरुणांनी केलेल्या मदत कार्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या